शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

हेलिकॉप्टरमध्ये बिघाडाची शंका होती, पण सभा रद्द केली नाही : पंकजा मुंडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 17:36 IST

"कालही वाटले होते की हेलिकॉप्टरमध्ये काही तांत्रिक बिघाड आहे. त्या तांत्रिक अडचणीमुळे मी त्या हेलिकॉप्टरने प्रवास केला नाही. मला सांगण्यात आले होते की दुसरे हेलिकॉप्टर पाठवण्यात येईल, मात्र त्यालाही विलंब झाला.

छत्रपती संभाजीनगर : राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरला आज छत्रपती संभाजीनगर विमानतळावर तांत्रिक बिघाड झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. सुदैवाने, उड्डाण घेण्यापूर्वीच हा बिघाड वैमानिकाच्या लक्षात आल्याने एक मोठी दुर्घटना टळली. दरम्यान, यावर आता स्वत: मुंडे यांनी स्पष्टीकरण दिले.

Latest Marathi News LIVE: छ. संभाजीनगरच्या महापौरपदासाठी AIMIM ची मोर्चेबांधणी, भाजपाला दूर ठेवण्यासाठी...

"कालही वाटले होते की हेलिकॉप्टरमध्ये काही तांत्रिक बिघाड आहे. त्या तांत्रिक अडचणीमुळे मी त्या हेलिकॉप्टरने प्रवास केला नाही. मला सांगण्यात आले होते की दुसरे हेलिकॉप्टर पाठवण्यात येईल, मात्र त्यालाही विलंब झाला. मी कारणे देऊन सभा रद्द केली असती, पण ते योग्य वाटले नाही. लोक वाट पाहत होते. ही कार्यकर्त्यांची निवडणूक असल्याने त्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. सभा घेऊन त्यांना ऊर्जा आणि ताकद द्यायला हवी. सभा दोन तास उशिरा झाली असली तरी लोक वाट पाहायला तयार होते, असंही मुंडे म्हणाल्या.

‘देव पाण्यात ठेवले’ याचा अर्थ असा होतो की आई रोज लँड झाली का? टेकऑफ झाली का? याच विचारात असते. अजित दादांच्या मोठ्या दुर्घटनेनंतर सगळ्यांची मनं हादरली आहेत. त्यामुळे लोकांच्या मनात तणाव आहे. अनेक कार्यकर्ते विमान किंवा हेलिकॉप्टरचा वापर करू नका, असे संदेशही देत आहेत. मात्र सध्या त्याला पर्याय नाही, असंही मुंडे म्हणाल्या.

पंकजा मुंडे म्हणाल्या, “बसण्याआधी सर्व तांत्रिक बाबी स्पष्ट केल्या जातात, त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही. काम थांबणार नाही. काही झालं तरी दौरा रद्द होणार नाही. नवीन लोकांना भीती वाटणं साहजिक आहे, पण आपलं कर्तव्य पार पाडावंच लागतं.”

लाडकी बहीण योजना

लाडकी बहीण योजनेला अजित पवार यांचं नाव देण्याच्या मागणीवर त्या म्हणाल्या, “याबाबत देवेंद्र फडणवीस योग्य निर्णय घेतील. हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे.”

अजित पवार यांच्या मृत्यूबाबत संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्यास पंकजा मुंडे यांनी नकार दिला. “मी कुणाच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देऊन मीडियाच्या लाईमलाईटमध्ये येत नाही. गेली २० वर्षे मी अशा गोष्टींवर बोलत नाही,” असं त्यांनी स्पष्ट केलं.

English
हिंदी सारांश
Web Title : Pankaja Munde suspected helicopter glitch, didn't cancel meeting, prioritized workers.

Web Summary : Pankaja Munde faced suspected helicopter trouble before a meeting but proceeded despite the delay. She prioritized supporting party workers, emphasizing their importance in the election. She acknowledged safety concerns after a recent incident but affirmed her commitment to her duties and dismissed rumors surrounding Ajit Pawar.
टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेBJPभाजपा