शहरं
Join us  
Trending Stories
1
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
2
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
5
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
6
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
7
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
8
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
9
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
10
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
11
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
12
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
13
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
14
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
15
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
16
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
17
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
18
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
19
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
20
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...

बसस्थानकात व्हीलचेअर असूनही उपयोग नाही; अपंग, ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास सुसह्य होणार तरी कसा ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2021 6:06 PM

या बसस्थानकांवर व्हीलचेअर आहेत की नाही, असतील तर कोठे आहेत, याची काहीही माहिती सामान्य लोकांना नाही.

ठळक मुद्देबसस्थानकातून ये-जा करणाऱ्या गाड्या - २५०पेक्षा अधिकबसस्थानकातून प्रवास करणारे प्रवासी - ३ ते ४ हजार

औरंगाबाद : सोबत असलेल्या ज्येष्ठ नागरिकाला व्हीलचेअरची गरज आहे. त्यामुळे येथे व्हीलचेअर कुठे मिळेल, असा प्रश्न मुख्य बसस्थानक येथील जवळपास ६ ते ७ कर्मचाऱ्यांना विचारण्यात आला. परंतु, प्रत्येक कर्मचाऱ्याने येथे व्हीलचेअर उपलब्धच नाही, असे सांगितले. 

बसस्थानकात व्हीलचेअर आहे की नाही, हेच कर्मचाऱ्यांना माहिती नसल्याने व्हीलचेअर असूनही तिचा काही उपयोग नाही, अशी परिस्थिती येथील मुख्य बसस्थानकात पाहायला मिळाली. स्मार्ट सिटी होऊ पाहणाऱ्या औरंगाबादच्या प्रशासनाने शहरातील बसस्थानकेही आता स्मार्ट बनविणे नितांत गरजेचे झाले आहे. मुख्य बसस्थानकात व्हीलचेअर असूनही ती कोणाला दिसत नाही आणि व्हीलचेअर असूनही ती चालविण्यासाठी रॅम्प तयार केलेले नाहीत. त्यामुळे मग अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांनी अडखळतच प्रवास करायचा का, असा प्रश्न निर्माण होत आहे. बसस्थानके, सरकारी कार्यालये, रेल्वे स्थानके, पर्यटन स्थळे, सार्वजनिक जागा या सर्वच ठिकाणी ज्येष्ठ आणि अपंगांच्या दृष्टीने योग्य त्या सोयीसुविधा असणे गरजेचे आहे. मात्र, या सर्वच सुविधांची वानवा बसस्थानकासह शहरातील अन्य सार्वजनिक ठिकाणी पाहायला मिळते.

व्हीलचेअर अधिकाऱ्यांच्या खोलीतमुख्य बसस्थानक आणि सिडको बसस्थानक या दोन्ही ठिकाणी व्हीलचेअर आहेत. मात्र, या बसस्थानकांवर व्हीलचेअर आहेत की नाही, असतील तर कोठे आहेत, याची काहीही माहिती सामान्य लोकांना नाही. मुख्य बसस्थानकात अधिकाऱ्यांसाठी असणाऱ्या कक्ष क्रमांक ५ येथे व्हीलचेअर ठेवण्यात आली आहे. सहसा या ठिकाणी कुणी जातही नाही आणि इथे व्हीलचेअर असू शकते, याचा अंदाजही कुणाला येत नाही.

बसस्थानकात रॅम्पच नाहीमुख्य बसस्थानकात व्हीलचेअर उपलब्ध असली तरी ती चालविण्यासाठी आवश्यक असणारा रॅम्पच नसल्याने व्हीलचेअरचा वापर करणार तरी कसा, असा प्रश्न उपस्थित होतो. बसस्थानकाच्या कोणत्याही प्रवेशद्वाराजवळ रॅम्प नाहीत. याशिवाय बसस्थानकाच्या पायऱ्यादेखील एवढ्या खराब अवस्थेत आहेत की, तेथूनही विनाअडथळा मार्गक्रमण करणे व्हीलचेअरला शक्य होणारे नाही.

मागील दीड वर्षापासून बसस्थानकामध्ये व्हीलचेअर आहे. पण ती कक्ष क्रमांक ५ येथे ठेवलेली आहे. या चेअरचा वापर खूप कमी जणांकडून केला जातो. बसस्थानकावर आलेल्या ज्येष्ठांना आणि दिव्यांगांना याची माहिती व्हावी, यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू. येथे व्हीलचेअर उपलब्ध आहे, अशी माहिती सांगणारे फलक मुख्य प्रवेशद्वार आणि इतरत्रही काही ठिकाणी लावू.- एस. ए. शिंदे, एस. टी. अधिकारी

पुण्याला जायचे असल्याने मी भोकरदन येथून औरंगाबादला आलो आहे. चालण्याचा त्रास होतो. त्यामुळे काठीचा आधार घेत चालावे लागत आहे. या बसस्थानकावर व्हीलचेअर उपलब्ध नाही, असे आम्हाला सांगण्यात आले. त्यामुळे मग काठीचा आधार घेऊनच बसपर्यंत पोहोचावे लागले. व्हीलचेअर असती तर चालण्याचे कष्ट नक्कीच वाचले असते.- उत्तम जाधव, प्रवासी

टॅग्स :Aurangabad Central Bus Standऔरंगाबाद मुख्य बसस्थानकAurangabad Cidco Bus Standऔरंगाबाद सिडको बसस्थानकtourismपर्यटन