कर्जमाफीला विरोध नाही, पण शाश्वत योजनांवर भर
By Admin | Updated: April 14, 2017 01:01 IST2017-04-14T01:00:09+5:302017-04-14T01:01:31+5:30
लातूर :उत्तर प्रदेशात झालेल्या कर्जमाफीचा अभ्यास आमचे सरकार करीत असल्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी येथे सांगितले.

कर्जमाफीला विरोध नाही, पण शाश्वत योजनांवर भर
लातूर : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला $ि$िवरोध नाही. मात्र शेतकरी कर्जबाजारीच होऊ नये, यासाठी शाश्वत उपाययोजनांवर आमच्या सरकारचा भर आहे़ तरीही उत्तर प्रदेशात झालेल्या कर्जमाफीचा अभ्यास आमचे सरकार करीत असल्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी येथे सांगितले.
महापालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ लातूर दौऱ्यावर आलेल्या खा. रावसाहेब दानवे यांनी ‘लोकमत’ कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी विविध प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तरे दिली. पंचायत ते पार्लमेंट हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. यापूर्वी स्थानिक पातळीवर यश मिळत नव्हते. परंतु, केंद्रात सत्ता आल्यापासून ग्रामपंचायत, नगरपालिकेतही यश मिळत आहे. राज्यात तब्बल अडीच हजार सरपंच भाजपाचे आहेत. तर नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वाधिक १० अध्यक्ष भाजपाचे झाले़ स्थानिक प्रश्न सोडविण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात असणे आवश्यक आहे. त्याशिवाय, प्रश्न सुटत नाहीत. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपाला मिळत असलेल्या यशाचे गमक काय? यावर खा. दानवे म्हणाले, आम्ही लोकांच्या मनात विश्वास निर्माण करण्याचे काम केले आहे. निवडणुका कशा जिंकाव्यात, यासाठी तब्बल १ लाख कार्यकर्त्यांना तीन दिवस मुक्कामी प्रशिक्षण दिले. यात राज्य व केंद्र शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची माहितीही त्यांना देण्यात आली. कार्यकर्त्यांचे संघटन असल्यास काहीही शक्य आहे़