देवाला गाभाऱ्यात जावून भेटण्याची गरज नाही

By Admin | Updated: April 25, 2016 00:35 IST2016-04-25T00:01:48+5:302016-04-25T00:35:51+5:30

नळदुर्ग : स्त्री ही निर्मितीची जनक असून, तिच्यातच दैवी शक्ती व देवपण आहे. त्यामुळे महिलांनी मंदिराच्या गाभाऱ्यात जावून देवाला भेटण्याची आवश्यकता नाही, असे मला वाटते,

There is no need to visit God in the house | देवाला गाभाऱ्यात जावून भेटण्याची गरज नाही

देवाला गाभाऱ्यात जावून भेटण्याची गरज नाही


नळदुर्ग : स्त्री ही निर्मितीची जनक असून, तिच्यातच दैवी शक्ती व देवपण आहे. त्यामुळे महिलांनी मंदिराच्या गाभाऱ्यात जावून देवाला भेटण्याची आवश्यकता नाही, असे मला वाटते, असे मत ज्येष्ठ गायिका तथा सूर्योदय परिवाराच्या महाराष्ट्र अध्यक्षा अनुराधा पौडवाल यांनी तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी येथे व्यक्त केले.
राष्ट्रसंत भैय्यू महाराज यांच्या जलअभियान सूर्योदय परिवार, यमुना मिशन, मथुरा ट्रस्ट व खुदावाडी ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने खुदावाडी येथील शिवारातील ओढ्याच्या पात्राचे रुंदिकरण, गाळ काढणे, व खोलीकरण कामाचे उद्घाटन प्रदीप बन्सल व अनुराधा पौडवाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. नाला रुंदिकरण कामाच्या शुभारंभानंतर अनुराधा पौडवाल यांच्या हस्ते खुदावाडी गावात गरजुंना वस्त्र व शिधा वाटप करण्यात आला.
यावेळी पौडवाल म्हणाल्या, स्त्रीपुढे देवदर्शनाशिवाय अनेक महत्वाची कामे व कौटुंबिक समस्या आहेत. त्या सोडविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केल्यास त्यांच्या प्रत्येक कृतीतून परमेश्वर दिसेल. खुद्द देवाचा देव महादेवाने सुद्धा स्त्री शरीराचे अर्धांग स्वीकारलेले आहे. यावरून स्त्रीचे महत्व व महात्म्य दिसून येते, असेही त्या म्हणाल्या. शहरात ट्राफीक, वायू प्रदुषण, कृत्रिमरित्या/रासायनिक खताचा वापर करून निर्माण केलेल्या भाजीपाला व महागाईच्या समस्या आहेत. ग्रामीण भागात दुष्काळ, पाणीटंचाई, पक्के रस्ते, नाल्या, आदीनी रौद्ररुप धारण केल्याचे दिसते. यावर सर्वांनी एकत्रित येवून मात करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यावेळी मिशन मथुराचे संस्थापक प्रदीप बन्सल, यमुनाचे संयोजक पंडित शर्मा, सूर्योदयचे श्रीकांत चव्हाण, माजी सरपंच डॉ. सिद्रामप्पा खजुरे, उपसरपंच शिवप्पा जवळगे, कैलास चिनगुंडे उपस्थित होते. सूत्रसंचालन मनोहर घोडके तर प्रास्ताविक डॉ. सिद्रामप्पा खजुरे यांनी केले. कैलास चिनगुंडे यांनी आभार मानले. यावेळी साहेबराव घुगे, बालाजी मोकाशे आदी उपस्थित होते.

Web Title: There is no need to visit God in the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.