शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
2
"काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
3
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
4
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
5
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
6
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
7
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
8
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
9
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
10
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
11
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
12
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
13
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
14
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
15
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
16
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
17
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
18
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
19
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

औरंगाबाद जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन नाही; मात्र बाजारपेठांसाठी निर्बंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 2:10 PM

नागरिक कोरोनाच्या अनुषंगाने असलेल्या सुरक्षासाधनांचा वापर करीत नसल्याची माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे आदेश बाजारपेठा रात्री ९ वाजेपर्यंतच

औरंगाबाद : कोरोना विषाणूच्या संसर्गाने जिल्ह्याला विळखा घातलेला आहे. रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. आरोग्य यंत्रणेवर त्याचा ताण पडत असून, शहर व जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन होण्यासारखी स्थिती असल्याच्या अफवांचे पेव सोशल मीडियातून फुटले आहे. त्याला जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पूर्णविराम दिला आहे. आता जिल्ह्यात लॉकडाऊन होणार नाही. मात्र, रात्री ९ वाजेनंतर सर्व बाजारपेठा बंद करण्यात येतील, याबाबत आदेश देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. 

लॉकडाऊन, कोरोना रुग्णवाढ आणि सोशल मीडियातील अफवा याबाबत जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले, १६ सप्टेंबरपासून जिल्हा व शहरातील बाजारपेठा रात्री ९ वाजेनंतर बंद करण्यात येतील. रात्री ९ वाजेनंतर बाजारपेठांमध्ये गर्दी कायम दिसते आहे. नागरिक कोरोनाच्या अनुषंगाने असलेल्या सुरक्षासाधनांचा वापर करीत नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे रात्री ८.३० वा. बाजारपेठा, व्यापारीपेठांमधील कर्मचाऱ्यांना घरी जाण्यासाठी वेळ असेल.  त्यानंतर ९ वाजेपर्यंत सर्व दुकाने बंद करण्यासाठी कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. रात्री होणारी गर्दी यातून कमी होईल, त्यामुळे हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. 

लॉकडाऊन हा शेवटचा पर्यायकोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी लॉकडाऊन करणे हा शेवटचा पर्याय आहे; परंतु आता पुनश्च: हरिओम करण्याबाबत शासनाने अनलॉक सुरू केले आहे. लॉकडाऊनच्या अनेक नियमांत शिथिलता आणली आहे. जनता कर्फ्यू राबविणे शक्य आहे, मात्र ते सध्या राबविता येईल, असे वाटत नाही. 

१७०० बेडस् आठवडाभरात वाढणारकोरोनाची लागण झालेल्या रुग्णांना किमान आॅक्सिजनचा बेड तरी तातडीने मिळावा, यासाठी आठवडाभरात १७०० बेडस् आॅक्सिजनसह उपलब्ध होतील, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. १७०० बेडस् वाढल्यानंतर जिल्ह्यात ३७०० बेडस् होतील. २५ हॉस्पिटल्स कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी सज्ज असतील. घाटीत ४०० बेडस्, एमजीएममध्ये ३००, जिल्हा रुग्णालयात १०० सह इतर हॉस्पिटल्समध्ये बेडस् वाढविण्यात येणार असल्याचा दावा त्यांनी केला. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबादAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद