जिल्ह्यात २,६६६ शाळांत इंटरनेटच नाही; मग ऑनलाइन शिक्षण सुरू कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:05 IST2021-07-09T04:05:55+5:302021-07-09T04:05:55+5:30

औरंगाबाद : शैक्षणिक सत्र सुरु झाले मात्र, ४,५५५ पैकी २,६६६ शाळांतील संगणकांना इंटरनेटची जोडणी नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ऑनलाइन शिक्षण ...

There is no internet in 2,666 schools in the district; So how to start online learning? | जिल्ह्यात २,६६६ शाळांत इंटरनेटच नाही; मग ऑनलाइन शिक्षण सुरू कसे?

जिल्ह्यात २,६६६ शाळांत इंटरनेटच नाही; मग ऑनलाइन शिक्षण सुरू कसे?

औरंगाबाद : शैक्षणिक सत्र सुरु झाले मात्र, ४,५५५ पैकी २,६६६ शाळांतील संगणकांना इंटरनेटची जोडणी नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ऑनलाइन शिक्षण कसे सुरू आहे. तसेच व्हर्च्युअल क्लासरुमची परिस्थिती काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सध्या सुरू ब्रिजकोर्समध्ये किती विद्यार्थी ऑनलाइन शिकताहेत. याबद्दल शिक्षण विभागच सध्या अनभिज्ञ आहे.

प्रत्येक शाळेत संगणक आहे की नाही. संगणकाला इंटरनेटच्या जोडणीबद्दल केलेल्या शिक्षण विभागाच्या माहिती संकलनातून तब्बल २,६६६ शाळांत इंटरनेटची जोडणी नसल्याचे समोर आले आहे. अशा शाळांत ऑनलाइन शिक्षणाची स्थिती काय याबद्दल अद्यापतरी कोणताही माहिती समोर आलेली नसून ऑनलाइन शिक्षण, ब्रीज कोर्स सुरू असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगितल्या जात आहे. ऑनलाइन शिक्षणात गेल्या वर्षीही ३० ते ४२ टक्क्यांपर्यंत उपस्थितीची नोंद आहे. ग्रामीण भागातील तांत्रिक, साधन सामुग्री उपलब्धतेच्या अडचणी, त्याला मिळणारा प्रतिसाद मोजण्याची यंत्रणा अद्याप तरी नाही. तसेच गेल्या दीड वर्षात विद्यार्थी काय शिकले. याबद्दलही साशंकता आहे.

---

तालुक्यातील शाळा - इंटरनेट असलेल्या - इंटरनेट नसलेल्या

औरंगाबाद - २७१ - ३१२

गंगापूर - २३० -२९२

कन्नड -१२२ -३४९

खुलताबाद -६१ -१२६

पैठण -१२३ -३०५

फुलंब्री -८२ -२१७

सिल्लोड -१६० -३४९

सोयगाव ३३ -११०

वैजापूर -९४ -३५६

औरंगाबाद शहर -७१३ -२४०

--

मोबाइलचा आधार

दोन शिक्षकी शाळा आहे. छोटेसे गाव असल्याने इंटरनेटची व्यवस्था नाही. त्यामुळे मोबाइलवरूनच सर्व कामे करतो. अध्यापनाचे कामही मोबाइलवरून करतो.

- योगेश पाटील, शिक्षक

---

गावात रेंजच येत नाही

आमची वस्ती डोंगर रांगेत व खोलगट भागात असल्याने मोबाइलची रेंज मिळण्यात अडचणी येतात. काही कंपनीच्या मोबाइलची रेंज येते. त्या मोबाइलवर हाॅटस्पाॅट घेऊन विद्यार्थी ऑनलाइन वर्गाला हजेरी लावतात. पण त्यात कधी चित्र दिसते तर कधी आवाज येतो. त्यापेक्षा प्रत्यक्ष वर्ग सुरू झाले पाहिजे.

- संजय सोनवणे, पालक, जंगला

---

आता शाळांत ब्राॅडबॅण्ड किंवा लॅण्डलाइन इंटरनेट सुविधा फारशी वापरली जात नाही. मोबाइल इंटरनेटचा वापरच सर्वत्र केला जातो. मुले सध्या शाळेत येत नाहीत. ते पालकांचा मोबाइल, तर शिक्षक त्यांच्या मोबाइलवरून अध्ययन अध्यापनाचे कार्य करतात. पण जिथे तांत्रिक अडचणी आहेत. तिथे पर्यायी व्यवस्थेची उपलब्धता करतोय.

-डाॅ. बी. बी. चव्हाण, शिक्षणाधिकारी, औरंगाबाद

Web Title: There is no internet in 2,666 schools in the district; So how to start online learning?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.