प्राधिकरणच्या प्रलंबित कामांना मुदतवाढ नाहीं

By Admin | Updated: May 21, 2014 00:17 IST2014-05-20T23:52:27+5:302014-05-21T00:17:46+5:30

उस्मानाबाद : तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे देवी दर्शनासाठी राज्यासह देशभरातून येणार्‍या भाविकांच्या सोयीसाठी प्राधिकरण अंतर्गत सुरू असलेली कामे प्रलंबित आहेत़

There is no extension of pending work of the Authority | प्राधिकरणच्या प्रलंबित कामांना मुदतवाढ नाहीं

प्राधिकरणच्या प्रलंबित कामांना मुदतवाढ नाहीं

उस्मानाबाद : तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे देवी दर्शनासाठी राज्यासह देशभरातून येणार्‍या भाविकांच्या सोयीसाठी प्राधिकरण अंतर्गत सुरू असलेली कामे प्रलंबित आहेत़ प्रत्येवेळी मुदतवाढ मिळत असल्याने शहर विकासासह भाविकांनाही याचा फटक बसत आहे़ त्यामुळे अशा कामांना आता मुदतवाढ देण्यात येणार नाही़ संबंधितांनी ही कामे वेळेत पूर्ण करावीत, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी दिला़ तुळजापूर येथील विश्रामगृहावर पालकमंत्री चव्हाण यांच्या उपस्थितीत प्राधिकरणच्या समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते़ यावेळी अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ़ प्रशांत नारनवरे, सदस्य नरेंद्र बोरगावकर, अप्पासाहेब पाटील, नगराध्यक्षा विद्याताई गंगणे, उपविभागीय पोलिस अधिकारी शर्मिष्ठा घारगे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता देशपांडे, वीज वितरणचे अधीक्षक अभियंता अरूण पापडकर, जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता भालेराव, जिल्हा नियोजन अधिकारी मक़ा़भांगे, तहसीलदार काशिनाथ पाटील, मंदिर संस्थानचे व्यवस्थापक सुजित नरहिरे, मुख्याधिकारी संतोष टेंगळे यांची उपस्थिती होती़ नवरात्रापूर्वी रस्ते, नाल्यांची कामे पूर्ण करावीत़ मंदिर संस्थान, नगर पालिका, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने समन्वयाने प्रश्न मार्गी लावावा, महामार्गा विभागाने अपघात टाळण्यासाठी रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवावेत, प्रलंबित देयके द्यावीत, नळ योजना सुरू करावी आदी सूचना त्यांनी केल्या़ (प्रतिनिधी) ठेकेदाराचे नाव काळ्या यादीत टाका विविध यंत्रणांनी दिलेली कामे विहित वेळेत करावीत़ कोणत्याही प्रकारे नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल़ त्यामुळे दर्जेदार कामे होण्यासह ती वेळेत पूर्ण करण्याकडे लक्ष द्यावे़ विकास कामे वेळेत पूर्ण करण्याच्या कामात हलगर्जी खपवून घेतली जाणार नाही़ संबंधित कामांच्या ठेकेदारामुळे झालेले नुकसान त्यांच्याकडून वसूल करण्याच्या आणि संबंधित ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी डॉ़ नारनवरे यांनी यावेळी दिल्या़

Web Title: There is no extension of pending work of the Authority

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.