शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यासाठी ७ टक्के पाणी कपातीचा गोदावरी अभ्यास गटाचा मराठीतून अहवाल नाहीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 12:44 IST

आक्षेप दाखल करण्यासाठी आजचा शेवटचा दिवस

छत्रपती संभाजीनगर : अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यांतून मराठवाड्यासाठी गोदावरीनदीत सोडण्यात येणारे पाणी ७ टक्के कपात करण्याची शिफारस करणाऱ्या गोदावरी अभ्यास गटाचा अहवाल मराठीतून उपलब्ध करण्यात आला नाही. एवढेच नव्हे तर या अहवालावर आक्षेप दाखल करण्यास मुदतवाढ देण्यात आली नाही. मंगळवार, दि. १५ एप्रिलपर्यंतच या अहवालावर आक्षेप दाखल करता येणार आहे.

जायकवाडी प्रकल्पात ६५ टक्क्यांपेक्षा कमी जलसाठा असेल तर समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यांतील धरणांतून गोदापात्रात पाणी सोडण्याचे निर्देश आहेत. यापूर्वीच्या मेंढेगिरी समितीच्या अहवालानुसार हे पाणी सोडण्यात येते. या अहवालावर सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केलेले आहे. असे असताना मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळू नये, यासाठी अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यांतील पुढारी कायम विरोध करीत असतात. या पुढाऱ्यांच्या सांगण्यावरून राज्य शासनाने २०२३ मध्ये मेरी संस्थेचे माजी अधिकारी प्रमोद मंदाडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. या समितीने दिलेल्या अहवालात मराठवाड्याचे पाणी ७ टक्के कपात करण्याची शिफारस करण्यात आली.

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने १४ फेब्रुवारी रोजी संकेतस्थळावर अहवाल प्रसिद्ध करून यावर १५ एप्रिलपर्यंत आक्षेप, हरकती मागितल्या आहेत. इंग्रजीतील हा अहवाल सर्वसामान्यांना समजत नाही. यामुळे हा अहवाल मराठीतून उपलब्ध करण्याची तसेच आक्षेप दाखल करण्यास मुदतवाढ देण्याची मागणी लेखी आणि ई-मेल स्वरूपात मराठवाड्यातील विविध सामाजिक संघटनांनी केली होती. तेव्हा प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी मराठीतून अहवाल उपलब्ध करण्याचे तत्त्वत: मान्य केले होते. तसे पत्र १७ मार्च रोजी शासनास पाठविले होते. आक्षेप दाखल करण्याची मुदत १५ एप्रिल रोजी समाप्त होत आहे. असे असले तरी प्राधिकरणाने हा अहवाल मराठीतून उपलब्ध केला नाही.

सुमारे ४ हजार आक्षेप दाखलमराठवाड्याचे पाणी कपात करण्याच्या विरोधात विविध सामाजिक संघटना, संस्था आणि नागरिकांनी सुमारे ४ हजार आक्षेप नोंदविले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. हा अहवाल मराठीतून उपलब्ध झाला असता तर आक्षेपांची संख्या वाढली असती, असे बोलले जात आहे. शिवाय पाणी कपातीच्या बाजूने नगर आणि नाशिककरांनी हरकती नोंदविल्याचे सूत्रांनी सांगितले.

पाण्याची समप्रमाणात विभागणीची मागणीमहाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरण कायद्याच्या कलम १२(६) क नुसार उपलब्ध पाण्याची समप्रमाणात विभागणी करणे, ही आमची प्रमुख मागणी आहे. पाणी कपात करून मराठवाड्यातील दुष्काळात भर घालण्याचे पातक कोणीही करू नये. मागणी करूनही प्राधिकरणाने गोदावरी अभ्यास गटाचा अहवाल मराठीतून उपलब्ध केला नाही.- जयसिंह हिरे, महाराष्ट्र जलसमृद्धी प्रतिष्ठान

टॅग्स :Marathwadaमराठवाडाgodavariगोदावरीriverनदीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर