शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

कापसाला भाव नाही, अवकाळी पावसाने पिके पडली; हतबल शेतकऱ्याने जीवन संपवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2023 19:43 IST

गंगापूर तालुक्यातील वाहेगाव येथील दुर्दैवी घटना

गंगापूर: कापसाला भाव नाही, त्यात अवकाळी पावसाने गहू, कांद्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. अपेक्षित उत्पन्न मिळणार नसल्याने आता कर्ज कसे फेडायचे या चिंतेतून एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. अशोक भिकाजी सिरसाठ (४७) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ही दुर्दैवी घटना गंगापूर तालुक्यातील वाहेगावा येथे बुधवारी (८) रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या दरम्यान घडली. 

वाहेगाव येथील रहिवासी असलेले अशोक सिरसाठ हे शेती व मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. त्यांच्याकडे असलेल्या शेतीपैकी एक एक्कर गहू तर अडीच एकर क्षेत्रावर कांदा आहे. शेतीसाठी त्यांनी खाजगी कर्ज काढले होते,कापूस पिकातून व गव्हाच्या उत्पादनातून सदरील कर्ज ते चुकते करणार होते. मात्र, कापसाला भाव मिळत नसल्याने अनेक दिवसांपासून पंधरा ते वीस क्विंटल कापूस घरात पडून होता. त्यात देणेकरांनी तगादा लावला होता. त्यामुळे अशोक सिरसाठ हे चिंतेत होते. कापसाचे अपेक्षित पैसे आले नाही तर कर्ज कसे चुकते करायचे याचा प्रश्न त्यांना भेडसावत होता. 

दरम्यान, रविवार व सोमवारी अवकाळी पावसाने शेतातील गव्हू व कांद्याचे पीक देखील आडवे पडले. यामुळे अशोक शिरसाठ पूर्णपणे खचले होते. कोणाशीही बोलत नव्हते. पत्नी व मुलाने त्यांची समजूत काढली होती. मात्र, बुधवारी (दि. ८) रात्री ते घरातून निघून गेले. कुटुंबीयांनी रात्रभर त्यांचा शोध घेतला मात्र ते कोठेही सापडले नाही. दुसऱ्या दिवशी गुरुवारी (दि. ९) सकाळी साडेसात वाजता त्यांच्या चुलत्याच्या शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत अशोक शिरसाठ यांचा मृतदेह आढळून आला. मृत शेतकऱ्याचा मुलगा जयदीप याने गंगापूर पोलिसांत याबाबत माहिती दिली. त्यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगा असा परिवार आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादfarmer suicideशेतकरी आत्महत्या