शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आमच्या विरोधात कोणी नाही; काहीजण काही दिवस कावकाव करतील, नंतर शांत बसतील: अब्दुल सत्तार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2022 19:35 IST

शिवसेना शिंदे गटास काही ठिकाणी जोरदार विरोध करत असल्याचे काही ठिकाणी चित्र आहे.

औरंगाबाद: शिंदे गटातील मंत्री आणि आमदारांना अनेक ठिकाणी शिवसैनिक विरोध करत आहेत. यामुळे शिंदे गटाच्या विरोधात उद्धव ठाकरे यांनी जोरदार आव्हान उभे केल्याचे चित्र आहे. शिंदे गटाला शिवसैनिकांच्या वाढत्या विरोधावर मंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमच्या विरोधात कोणी नाही. फक्त काही लोक काही दिवस कावकाव करतील, नंतर शांत बसतील, असा जोरदार टोला त्यांनी लगावला आहे. 

मंत्रीपदाची शपथ घेतल्यानतंर अब्दुल सत्तार यांचे आज औरंगाबादेत आगमन झाले. त्यावेळी विमानतळावर त्यांनी माध्यमांशी सवांद साधला. सत्तार पुढे म्हणाले, खाते वाटत दोन दिवसात होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी जबाबदारी देतील ती  चोखपणे पार पाडू. पुढील विस्तारात शिरसाट यांचा मंत्रीमंडळात समावेश करण्याबाबत मुख्यमंत्री लक्ष देतील. ते नाराज नाहीत, असेही सत्तार म्हणाले. 

काहीजण कावकाव करतील शिंदे गटातील आमदारांना मुंबई, पुणे, सोलापूर येथे शिवसेनेकडून विरोध होत आहे. शिवसेना शिंदे गटाच्या विरोधात उभी राहत आहे. यावर प्रश्न विचारला असता सत्तार यांनी जोरदार टीका केली. शिवसेना विरोधात उभी राहिली काय आणि नाही राहिली काय. राज्यातील जनतेच्या कौल मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत आहे. काहीजण काही दिवस कावकाव करतील, नंतर शांत बसतील, असे सत्तार म्हणाले.

टॅग्स :Abdul Sattarअब्दुल सत्तारAurangabadऔरंगाबादUddhav Thackerayउद्धव ठाकरे