फडणवीसांच्या निवडीने जालनेकरांच्या आशा पल्लवित
By Admin | Updated: October 30, 2014 00:26 IST2014-10-30T00:11:23+5:302014-10-30T00:26:10+5:30
जालना : राज्यात विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळविणाऱ्या भाजपाने मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड केल्यानंतर जालना जिल्ह्यासह शहरात मंगळवारी

फडणवीसांच्या निवडीने जालनेकरांच्या आशा पल्लवित
जालना : राज्यात विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळविणाऱ्या भाजपाने मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड केल्यानंतर जालना जिल्ह्यासह शहरात मंगळवारी व बुधवारी फटाक्यांची आतीषबाजी करून ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी पेढ ेवाटप केले.
फडणवीस यांच्या निवडीचे वृत्त जाहीर होताच मंगळवारी सायंकाळी येथील भाजपाच्या जिल्हा कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतीषबाजी करून आपला आनंद व्यक्त केला. त्याचप्रमाणे जुना जालन्यातील शनिमंदिर, गांधीचमन, नवीन जालन्यातील बडीसडक, सराफा या भागातही फटाक्यांची आतीषबाजी करण्यात आली. भोकरदन, जाफराबाद, बदनापूर, अंबड, घनसावंगी, परतूर, मंठा आदी ठिकाणीही कार्यकर्त्यांनी या निवडीचे जोरदार स्वागत केले.
३१ आॅक्टोबर रोजी मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांच्यासह काही प्रमुख मंडळींचा मंत्रिपदी शपथविधी होणार असल्याने या दिवशीही मोठ्या प्रमाणात आनंदोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती शहर सरचिटणीस रवींद्र देशपांडे यांनी दिली. (प्रतिनिधी)
देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत आगामी काळात विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र देशात नंबर वन होईल, अशी प्रतिक्रिया भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली आहे.
४विलास नाईक (माजी उपनगराध्यक्ष) - फडणवीस यांचे व्यक्तीमत्व आदर्शवादी आहे. २७ व्या वर्षीच त्यांनी महापौरपदाचा कार्यभार सांभाळला. उत्कृष्ट वक्ता, जनसामान्यांच्या प्रश्नांचा अभ्यास असल्याने त्यांनी राज्यात नवचैतन्य निर्माण केलेले आहे.
४किशोर अग्रवाल (जिल्हा सरचिटणीस) - फडणवीस यांच्या निवडीमुळे राज्याला युवा व स्वच्छ प्रतिमा असलेले कल्पक नेतृत्व मिळाले आहे. आगामी काळात महाराष्ट्र निश्चितच विकासाच्या यशोशिखरावर पोहोचेल, यात शंका नाही.
४देवीदास देशमुख (जिल्हा सरचिटणीस) - देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यामुळे महाराष्ट्राच्या प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस उंचावत जाणार आहे. प्रगतीच्या आलेखबाबत देशात महाराष्ट्राला ते नंबर वन बनवतील, हे निश्चित.
४रवींद्र देशपांडे (शहर सरचिटणीस) - देवेंद्र फडणवीस यांच्या निवडीमुळे तरूणांचा उत्साह वाढला आहे.
ते देशात महाराष्ट्राला विकासाच्या बाबतीत नंबर वन बनवतील, यात कसलीशही शंका नाही.