भर पावसातही निघाले दोन मोर्चे
By Admin | Updated: August 3, 2016 00:17 IST2016-08-03T00:03:31+5:302016-08-03T00:17:02+5:30
औरंगाबाद : अखिल भारतीय समता सैनिक दल व महिला बचत गटातर्फे भडकलगेट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून कमांडर इन चीफ

भर पावसातही निघाले दोन मोर्चे
औरंगाबाद : अखिल भारतीय समता सैनिक दल व महिला बचत गटातर्फे भडकलगेट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून कमांडर इन चीफ अॅड. डी. व्ही. खिल्लारे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चात महिलांचा अधिक सहभाग होता.
मनपा कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय व विभागीय आयुक्त कार्यालयावर हा मोर्चा गेला. आंबेडकर भवनप्रकरणी रत्नाकर गायकवाड यांना अटक करण्यात यावी, मायावती यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या भाजपच्या दयाशंकर सिंह यांना अटक करण्यात यावी, आरएसएस व भाजपच्या जातीयवादी संघटनांवर बंदी घालण्यात यावी, महिला बचत गटांना चार हजार घरकुले मंजूर करण्यात यावीत, तसेच त्यांना रॉकेल दुकाने व रॉकेल एजन्सी मंजूर करण्यात यावी, स्वप्नील सोनवणे याची हत्या करणाऱ्या नराधमांना कडक शिक्षा करण्यात यावी, राज ठाकरे यांच्यावर अॅट्रॉसिटी रद्द करावी या वक्तव्याच्या संदर्भात गुन्न्हा दाखल करण्यात यावा आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. यात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सहभागी झाले होते.