शहरं
Join us  
Trending Stories
1
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
3
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
4
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
5
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
6
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
7
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
10
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
11
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
12
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
13
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
14
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
15
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
16
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
17
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
18
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
19
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
20
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?

एका डीपीवर आता दोनच कृषिपंप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 12:19 AM

शेतक-यांना कृषिपंपासाठी लवकरच हाय व्होल्टेज वीज जोडणी मिळणार आहे. यासाठी महावितरण कंपनीने उच्चदाब वितरण प्रणाली योजना (एचव्हीडीएस) आणली असून, यापुढे एका डीपीवर (रोहित्र) जास्तीत जास्त दोन ते तीन कृषिपंप असणार आहेत.

ठळक मुद्देशेतऱ्यांना दिलासा : हाय व्होल्टेज वीज जोडणी; वीज चोरीला वाव नाही

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शेतक-यांना कृषिपंपासाठी लवकरच हाय व्होल्टेज वीज जोडणी मिळणार आहे. यासाठी महावितरण कंपनीने उच्चदाब वितरण प्रणाली योजना (एचव्हीडीएस) आणली असून, यापुढे एका डीपीवर (रोहित्र) जास्तीत जास्त दोन ते तीन कृषिपंप असणार आहेत. सततच्या विद्युत पुरवठा खंडित होण्याच्या कटकटीपासून यामुळे शेतक-यांची आता कायमची सुटका होणार आहे.गेल्या दोन वर्षांपासून कृषिपंपांच्या वीज जोडणीसाठी शेतक-यांनी कोटेशन भरलेले आहे. तरीही मराठवाड्यातील ६७ हजार ३७४, तर मराठवाड्यासह औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत तब्बल ८७ हजार ४८४ शेतकरी अद्यापही वीज जोडणीच्या प्रतीक्षेतच आहेत. या शेतकºयांसह नव्याने मागणी करणाºया ग्राहकाला ‘एसव्हीडीएस’ या योजनेतून जोडणी दिली जाणार आहे. सध्या ६५ व १०० केव्हीए क्षमतेच्या एका रोहित्रावरून २० ते २५ कृषिपंपांसाठी विद्युत पुरवठा केला जातो. आकडे टाकून विजेचा वापर करणारांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे लोड येऊन रोहित्र जळण्याचे प्रमाण मोठे आहे. प्रचलित पद्धतीमुळे लघुदाब वाहिनीची लांबी वाढते, वीज हानी मोठ्या प्रमाणात होते. शिवाय कृषिपंपांना कमी दाबाने वीजपुरवठा होतो. वीजपुरवठ्यात वारंवार बिघाड होतो. यावर ‘एचव्हीडीएस’ योजनेद्वारे या सर्वांवर मात करता येणे शक्य होणार आहे. या नव्या उच्चदाब प्रणालीत उच्चदाब वाहिन्यांवर आकडे टाकून वीजचोरी करता येणार नाही. नव्या प्रणालीमध्ये एका रोहित्रावरून दोन अथवा जास्तीत जास्त तीनच कृषिपंपांना वीज जोडणी दिली जाणार आहे. त्यामुळे रोहित्रावर ताण येणार नाही. तो जळणार नाही. आकडा टाकून वीज घेता येणार नाही. ही प्रणाली राबविण्यासाठी औरंगाबाद झोन कार्यालयाने सर्व शिवारांमध्ये फिरून सर्वेक्षण पूर्ण केले आहे.दर वाढल्याने दुसºयांदा अंदाजपत्रकयासंदर्भात महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर म्हणाले की, ‘एचव्हीडीएस’ या नव्या योजनेसाठी महावितरणने औरंगाबाद झोनमध्ये सर्वेक्षण केले आहे. यामध्ये प्रामुख्याने सध्या कार्यरत कृषिपंप किती, किती कृषिपंपांना मीटर आहेत, या योजनेसाठी रोहित्रांची गरज किती, उच्चदाब वाहिन्यांची आवश्यकता किती आदी माहिती संकलित करण्यात आली. यासंदर्भात अंदाजपत्रकही तयार करण्यात आले होते; पण उपकरणे व साहित्याचे दर वाढल्यामुळे पहिले अंदाजपत्रक रद्द करण्यात आले असून, नव्याने अंदाजपत्रक तयार केले जात आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणAurangabadऔरंगाबादAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी