शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

शहरात दिसत नाहीत कावळे अन् गाईला खाऊ देत नाहीत; पूर्वजांच्या नावाचे पिंड कोणाला द्यावे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2024 16:51 IST

पितृपक्ष असो वा श्राद्ध या काळात कावळ्यालाच का घास खाऊ घालतात? जाणून घ्या

छत्रपती संभाजीनगर : शहरात कावळे दुर्मीळ झाल्याने पूर्वजांच्या नावाने तयार केलेले पिंड कोणाला खाऊ घालायचे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. कावळे दिसेनासे झालेत आणि ते पिंड गाईला खाऊ घालू देत नाहीत. यामुळे सर्वांची पंचाईत झाली आहे.

पितृपक्ष पंधरवड्याला बुधवारपासून सुरुवात झाली. आपल्या पूर्वजांना पितृपक्षात जेवणाचे आमंत्रण दिले जाते. पूर्वजांना संतुष्ट करण्यासाठी तांदळाच्या भाताचे पिंड तयार करण्यात येते. त्यातील वैश्व देवाचा उरलेला भात (काकबली) कावळ्याला खाण्यासाठी दिला जातो. मात्र, शहरात कावळे नसल्याने पिंड गच्चीवर ठेवले जाते. मग त्यास अन्य पक्षी खातात. दुसरे पूर्वजांच्या नावाने तयार केलेले पिंड अनेकजण गाईला खाऊ घालतात. त्यामुळे गाईचे पोट खराब होते. त्या ऐवजी ते पिंड पाण्यात टाकावे. जलचर प्राणी ते खातात.

ब्राह्मण पुरोहित संघाचे अध्यक्ष विश्वास नागापूरकर गुरूजी यांनी सांगितले की, पर्याय म्हणून पूर्वजांच्या नावाचे पिंड घराच्या अंगणात जेथे रोप लावले आहे तेथे मातीत खड्डे खोदून त्यात ठेवावे व त्यावर माती टाकावी. ते मुंग्यांसारखे सूक्ष्म जीव खाऊन टाकतील.

दीड हजार पुरोहित करतात श्राद्धपक्षआजघडीला शहरात ३००० पुरोहित आहेत. त्यातील सुमारे दीड हजार पुरोहित श्राद्धपक्षाचा विधी करतात. जेवणासाठी एक किंवा दोन ब्राह्मण सोबत नेतात. पितृपक्ष पंधरवड्यात जेवणारे फार कमी असतात. यामुळे नोकरी करणारे किंवा सेवानिवृत्त झालेल्या ब्राह्मणांना न्यावे लागते.

कावळ्यालाच घास का?पितृपक्ष असो वा श्राद्ध या काळात कावळ्यालाच का घास खाऊ घालतात? यासंदर्भात नागापूरकर गुरुजी यांनी सांगितले की, वड व पिंपळ २४ तास शुद्ध हवा देणारे वृक्ष आहेत. या दोन्ही झाडांना जे अंकुर येतात ते कावळे खातात. त्या फळांचे मिश्रण पोटात तयार होऊन जी विष्टा तयार होते त्या विष्टेपासून वड, पिंपळ वृक्ष जमिनीत तयार होतात. हे केवळ कावळाच करू शकतो. पितृपक्ष हा कावळा मादींचा प्रजनन काळ आहे. म्हणून त्या मादीस चांगले पदार्थ खाण्यास मिळावे व पुढे कावळ्यांचा वंश वाढावा म्हणून त्यांना नैवेद्य देण्यात येतो.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSocialसामाजिक