..तर सत्यागृह करणार
By Admin | Updated: July 12, 2015 00:42 IST2015-07-12T00:42:30+5:302015-07-12T00:42:30+5:30
तुळजापूर : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी विमा कंपनीकडून १५५ कोटी १३ लाख ८ हजार रुपये एक महिन्यापूर्वी प्राप्त झाले आहेत. परंतु, जिल्हा बँकेकडू

..तर सत्यागृह करणार
तुळजापूर : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी विमा कंपनीकडून १५५ कोटी १३ लाख ८ हजार रुपये एक महिन्यापूर्वी प्राप्त झाले आहेत. परंतु, जिल्हा बँकेकडून ही रक्कम अद्यापही संबंधितांच्या खात्यावर वर्ग करण्यात आलेली नाही. येत्या चार दिवसांत शेतकऱ्यांना हे पैसे नाही मिळाल्यास पावसाळी अधिवेशनात विधानभवनासमोरील पायऱ्यांवर अन्नत्याग सत्यागृह करण्यात येणार असल्याची माहिती आ. मधुकरराव चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सध्या जिल्ह्यात पावसाअभावी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. जनावरांसाठी चारा नाही, प्यायला पाणी नाही. शेतकऱ्यांजवळ पैसा नाही. अशा स्थितीत जिल्हा सहकारी बँकेने शेतकऱ्यांच्या हक्काची विम्याची रक्क़म एक महिन्यापासून फिक्स डिपॉझिट करून ठेवली आहे. सदरच्या रकमेवर मिळणारे व्याज शेतकऱ्यांच्या विमा रकमेसोबत देण्यात यावे. तसेच शेतकऱ्यांकडून ठेवीसाठी कोणतीही रक्कम कपात करू नये. तालुक्यातील २६ कोटी रुपये पीकविमा रक्कम चार दिवसात नाही मिळाल्यास आपण विधान भवनासमोर सत्यगृह करू. तशा प्रकारची नोटीसही आपण जिल्हाधिकारी व विधानसभा अध्यक्षांना दिली असल्याचे ते म्हणाले. यावेळी जि. प. अध्यक्ष अॅड. धीरज पाटील, काँग्रेस शहराध्यक्ष भारत कदम, इंटकचे कुतवळ आदी उपस्थित होते. (वार्ताहर)