शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

...तर माझ्या मृत्यूला ठाकरे सरकार जबाबदार असेल; संतप्त एसटी कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा इशारा, व्हिडिओ व्हायरल

By सुमेध उघडे | Updated: February 23, 2021 17:54 IST

ST employee's suicide warning to State Government पांचाळ किरण अनिरुद्ध असे या कर्मचाऱ्याचे नाव असून ते औरंगाबाद येथील सिडको बस स्थानकामध्ये वाहक म्हणून कार्यरत आहेत.

ठळक मुद्देजानेवारी महिन्यात मुंबई नियुक्तीदरम्यान त्यांना कोरोना झाला कोरोना उपचारानंतर जॉईन झाल्यास त्यांना पुन्हा मुंबईला नियुक्ती देण्यात आली

औरंगाबाद : मुंबई येथे नियुक्तीदरम्यान कोरोना झाल्यानंतर एका एसटी कर्मचाऱ्यास रुजू झाल्यानंतर लागलीच पुन्हा एकदा मुंबई येथे नियुक्ती देण्यात आली आहे. या प्रकाराने संतप्त झालेल्या या कर्मचाऱ्याने थेट आत्महत्येची धमकी दिली आहे. हा कर्मचारी शहरातील सिडको बसस्थानकात वाहक म्हणून कार्यरत आहे. त्याने एका व्हिडिओच्या माध्यमातून, माझी कोरोनामधून बरे झाल्यानंतर पुन्हा मुंबईत जाण्याची मानसिकता नाही . वरिष्ठ माझे ऐकत नाहीत. याची दखल घेतली नाही तर मी आत्मदहन करेल, माझ्या मृत्यूला शिवसेना आणि हे सरकार जबाबदार असेल असे म्हटले आहे.  हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. 

पांचाळ किरण अनिरुद्ध असे या कर्मचाऱ्याचे नाव असून ते औरंगाबाद येथील सिडको बस स्थानकामध्ये वाहक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी व्हिडिओमध्ये सांगितल्यानुसार, जानेवारी महिन्यात ते मुंबई येथे नियुक्तीवर होते. त्यानंतर परत आल्यास त्यांना कोरोनाचे निदान झाले. उपचारानंतर ते १७ फेब्रुवारीस परत नोकरीवर जॉईन झाले. यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांना पुन्हा मुंबई येथे नियुक्ती देण्यात आल्याचे कार्यालयाने सांगितले. मात्र, कोरोना आजारपणामधून बरे झाल्यानंतर लागलीच पुन्हा मुंबई येथे काम करण्याची मानसिकता नसल्याने त्यांनी आपली नियुक्ती रद्द करावी अशी विनंती वरिष्ठांना केली. परंतु, वरिष्ठांनी त्यांना मुंबईला जावेच लागेल असे सांगितले. यामुळे संतापलेल्या पांचाळ यांनी व्हिडिओद्वारे माझा मृत्यू झाला तर याला शिवसेना आणि सरकार जबाबदार असेल. माझी नियुक्ती रद्द झाली नाही तर मी आत्मदहन करेल असा इशारा सुद्धा त्यांनी दिला आहे. 

मृत्यूला ठाकरे सरकार जबाबदार असेल किरण पांचाळे यांच्या व्हायरल व्हिडिओ ते मी शिवसेनेच्या विचारांशी प्रभावित आहे. माझे वडील शिवसेनेचे काम करतात. मात्र, माझी मानसिकता नसताना मला पुन्हा मुंबईला नियुक्ती करण्यात येत आहे. ती रद्द करावी यासाठी माझी कोणीच मदत करत नाही असे म्हटले आहे. 'मला विश्वास आहे माझ्या ठाकरे सरकारवर ते मला न्याय देतील. मी खैरनार साहेब यांना दहा वेळा विनंती केली की, मला जायचे नाही. याची जर दखल घेतली नाही तर याला शिवसेना आणि आपले जे सरकार आहे ते जबाबदार राहील' असे ही म्हटले आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेstate transportएसटीAurangabadऔरंगाबाद