वसंतराव नाईक महामंडळाच्या तत्कालीन व्यवस्थापकाला अटक
By Admin | Updated: December 22, 2016 23:48 IST2016-12-22T23:29:59+5:302016-12-22T23:48:50+5:30
लातूर : वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळाच्या लातूर कार्यालयाचे तत्कालीन व्यवस्थापक दादासाहेब गणपती जाधव व दलाल सूर्यकांत विठोबा राठोड यांना शिवाजीनगर पोलिसांनी बुधवारी रात्री अटक केली़

वसंतराव नाईक महामंडळाच्या तत्कालीन व्यवस्थापकाला अटक
लातूर : वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळाच्या लातूर कार्यालयाचे तत्कालीन व्यवस्थापक दादासाहेब गणपती जाधव व दलाल सूर्यकांत विठोबा राठोड यांना शिवाजीनगर पोलिसांनी बुधवारी रात्री अटक केली़ दरम्यान, या दोघांना गुरूवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे़
वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळाच्या लातूर कार्यालयातून २०११-१२ मध्ये अनेक बोगस कर्ज प्रकरणे झाली होती़ या प्रकरणांची विभागीय चौकशी सुरू आहे़ दरम्यान, विद्यमान व्यवस्थापक प्रेमसिंग राठोड यांनी २०११-१२ मधील बोगस कर्ज प्रकरणाबाबत शिवाजीनगर पोलीसांत दोन महिन्यांपूर्वी फिर्याद दिली होती़ या फिर्यादीनुसार दादासाहेब जाधव याच्या विरूद्ध फसवणुकीचा गुन्हा शिवाजीनगर पोलीसांनी नोंदविला होता़ दरम्यान, जाधव याने अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी न्यायालयात अर्ज केले होते़ परंतु, जामीन फेटाळल्याने शिवाजीनगर पोलीसांनी जाधव यास बुधवारी रात्री अटक केली़ त्याच्याबरोबर दलाल सूर्यकांत राठोड यासही अटक केली असून, न्यायालयाने या दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे़