‘तो’ ट्रकचालक एक महिन्यानंतर गजाआड
By Admin | Updated: May 10, 2017 00:47 IST2017-05-10T00:45:44+5:302017-05-10T00:47:29+5:30
भोकरदन : पोलिस कर्मचाऱ्याच्या अंगावर वाळूचे टिप्पर घालून पळून गेलेल्या चालकास तब्बल एक महिन्या नंतर अटक करण्यात पोलिसाना यश आले.

‘तो’ ट्रकचालक एक महिन्यानंतर गजाआड
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : पोलिस कर्मचाऱ्याच्या अंगावर वाळूचे टिप्पर घालून पळून गेलेल्या चालकास तब्बल एक महिन्या नंतर अटक करण्यात पोलिसाना यश आले. या चालकास न्यायालया समोर हजर केले असता त्याना चार दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे़
उपविभागीय अधिकारी हरिश्चंद्र गवळी यांनी ७ एप्रिल रोजी नळणी शिवारात अवैध वाळूची वाहतूक करीत असलेले टिप्पर (एमएच- २१ एक्स ८२८४) पकडून पोलिस कर्मचाऱ्याच्या ताब्यात दिली. भोकरदन पोलिस ठाण्यातील कर्मचारी गणेश पायघन व चौधरी यांनी हे टिप्पर भोकरदन पोलिस ठाण्यात घेऊन येत असताना बरंजळा साबळे जवळ टिप्पर चालक मंगेश कैलास लोखंडे (२५, रा़मानदेऊळगाव, ता. बदनापूर) याने टिप्पर पोलिस कर्मचारी गणेश पायघन यांच्या अंगावर घालून टिप्पर घेऊन पळून गेला होता. त्यानंतर पोलिसांनी दोन दिवसांनी टिप्पर पकडले व त्याच्या विरूध्द भोकरदन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. मात्र चालक फरारच होता त्याची न्यायलयात अटक पूर्व जामीन फेटाळल्यानंतर ८ मे रोजी त्याला अटक करण्यात आली व न्यायालया समोर हजर केले असता त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे़ परिसरात वाळू माफियांकडून वाळू पट्ट्यातून अवैध उपसा केला जात आहे.