वीज उपकेंद्रात चोरी
By Admin | Updated: March 14, 2016 00:31 IST2016-03-14T00:26:01+5:302016-03-14T00:31:01+5:30
पुसेगाव : येथील ३३ के.व्ही. उपकेंद्रात चोरी झाल्याची घटना घडली. चोरटे उपकेंद्रात घुसल्यानंतर आॅपरेटरला चाकूचा धाक दाखवून रोख १२५० रूपये व तीन मोबाईल त्यांनी चोरून नेले.

वीज उपकेंद्रात चोरी
पुसेगाव : सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथील ३३ के.व्ही. उपकेंद्रात १३ मार्च रोजी पहाटे ४ वाजता चोरी झाल्याची घटना घडली. चोरटे उपकेंद्रात घुसल्यानंतर आॅपरेटरला चाकूचा धाक दाखवून रोख १२५० रूपये व तीन मोबाईल त्यांनी चोरून नेले. यात एकूण ९ हजार १५० रूपयांचा माल चोरून नेला असल्याची फिर्याद नर्सी नामदेव ठाण्यात आॅपरेटर शेख अब्दुल (२५) यांनी दिली आहे.
रविवारी दुपारी नर्सी ठाण्यामध्ये अज्ञात ४ चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाण्याचे सपोनि बद्रीनाथ सानप यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार एम.के. नागरे, पंढरी चव्हाण करीत आहेत. दरम्यान, शिलोभाबाई विठ्ठल धवसे यांच्या राहत्या घरी १३ मार्च रात्री २ वाजता घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करीत असताच घरातील शिलोभाबाई धवसे जागी होवून आरडाओरड केली असता घराशेजारी जागी होताच चोरट्यांनी पळ काढला. चोऱ्यांचे प्रमाण वाढल्यामुळे रात्रीच्या वेळी पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी करण्यात येत आहे. (वार्ताहर)