मेंढी शिवारातील चोरीचा गुन्हा उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:03 IST2021-09-18T04:03:52+5:302021-09-18T04:03:52+5:30

२ ऑगस्ट रोजी कल्पना सोळंके (५०) या आपल्या शेतातील घरात एकट्या होत्या. दुपारी ३ वाजेच्या सुमारास चार जणांनी त्यांना ...

Theft of sheep from Shivara revealed | मेंढी शिवारातील चोरीचा गुन्हा उघड

मेंढी शिवारातील चोरीचा गुन्हा उघड

२ ऑगस्ट रोजी कल्पना सोळंके (५०) या आपल्या शेतातील घरात एकट्या होत्या. दुपारी ३ वाजेच्या सुमारास चार जणांनी त्यांना चाकूचा धाक धाकवून मारहाण करीत रोख १० हजार रुपये, दुचाकी व घरातील सोन्याचे दागिने असा एकूण ६८ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून पोबारा केला होता. या चोरी प्रकरणात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली. खबऱ्याकडून त्यांना ही चोरी चक्रीश चव्हाण याने केल्याची माहिती मिळाली. त्याआधारे पोलिसांनी कोपरगाव येथे चक्रीश चव्हाण (२९) यास ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. सदरील कामगिरी गुन्हे शाखेचे पोनि. संतोष खेतमाळस, पोउनि. विजय जाधव, पोहेकॉ. विठ्ठल राख, दीपेश नागझरे, संजय भोसले, आदींनी पार पाडली.

170921\screenshot_20210917-175101_whatsapp.jpg

गंगापूर : आरोपी चक्रीश चव्हाण याच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस

Web Title: Theft of sheep from Shivara revealed