घाटनांद्रा येथे पुन्हा कृषिसेवा केंद्रात चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:05 IST2021-08-19T04:05:31+5:302021-08-19T04:05:31+5:30

दर महिन्यात पंधरा ते वीस दिवसांच्या कालावधीत घाटनांद्रा गावात चोरीचे सत्र सुरूच आहे. पोलीसही घटनास्थळावर दाखल होऊन केवळ पंचनाम्याची ...

Theft at Krishiseva Kendra at Ghatnandra again | घाटनांद्रा येथे पुन्हा कृषिसेवा केंद्रात चोरी

घाटनांद्रा येथे पुन्हा कृषिसेवा केंद्रात चोरी

दर महिन्यात पंधरा ते वीस दिवसांच्या कालावधीत घाटनांद्रा गावात चोरीचे सत्र सुरूच आहे. पोलीसही घटनास्थळावर दाखल होऊन केवळ पंचनाम्याची औपचारिकता पूर्ण करतात. तपासाचे चक्रे मात्र काही केल्या फिरविली जात नाही. दुकान मालक मनोज दिलीपसिंग बिसेन यांनी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सुमारे ६५ हजारांचा माल चोरी गेल्याचे त्यांनी सांगीतले. सपोनि. प्रल्हाद मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार देविदास जाधव, आकाश सोनवणे यांनी पंचनामा केला, तर पुढील तपास पोलीस करीत आहेत.

-----

गेल्या पंधरा वीस दिवसांत घाटनांद्रा गावात चोरीचे सत्र सुरूच आहे. काही दिवसांपूर्वीच सुभाष सुरडकर यांच्या ग्राहकसेवा केंद्रातही चोरट्यांनी रोख रकमेसह इतर साहित्य लंपास केले. त्या चोरीचा तपासही अद्यापही लागलेला नाही. सुरडकर यांनी पोलिसांकडून तपासचक्रे फिरविली जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Web Title: Theft at Krishiseva Kendra at Ghatnandra again