आॅईलमिलमधील चोरी; एक जण गजाआड
By Admin | Updated: May 25, 2015 00:24 IST2015-05-25T00:03:02+5:302015-05-25T00:24:10+5:30
जालना : नविन औद्योगिक वसाहतीत २२ मे रोजी पहाटे ४.२५ वाजेच्या सुमारास सद्गुरु आॅईल मिल येथे अज्ञात चोरट्यांनी घुसून ५० हजाराचा ऐवज चोरुन नेला

आॅईलमिलमधील चोरी; एक जण गजाआड
जालना : नविन औद्योगिक वसाहतीत २२ मे रोजी पहाटे ४.२५ वाजेच्या सुमारास सद्गुरु आॅईल मिल येथे अज्ञात चोरट्यांनी घुसून ५० हजाराचा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी कदिम जालना पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा नोंदविला. दरम्यान, रविवारी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवित मुख्य आरोपी अर्च्या उर्फ अब्दुल फकीरा खरात (वय २५, माडी, ता.अंबड) यास गजाआड केले.
राजेंद्र भरतीया यांची नवीन औद्योगिक वसाहतीत सद्गुरु आॅईल मिल आहे. येथे अज्ञात चोरट्यांनी पहाटे ४ वाजेच्या सुमारास मिलच्या पाठीमागील लोखंडी शिडीने प्रवेश करुन गच्चीवर जाऊन लोखंडी दरवाजाचे कुलूप तोडले. आत प्रवेश केल्यानंतर खाली असलेल्या स्टोअर रुमच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. येथे असलेले १६० किलो वजनाचे २८ नगर, लोखंडी पट्ट्याचे केज वायर, साडेसात हॉर्स पॉवरच्या दोन विद्युत मोटारी, पंधरा किलो वजनाच्या वायरसह एकूण ४९ हजार ३०० रुपयांचा ऐवज लंपास केला होता. याप्रकरणी भरतीया यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा नोंदविण्यात आला. रविवारी पोलिस अधीक्षक ज्योतिप्रियासिंह, उपविभागीय अधिकारी दीक्षितकुमार गेडाम, पोलिस निरीक्षक योगेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोउपनि मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आरोपीस गजाआड केले. त्याच्याकडून आणखी चोऱ्या उघडकीस येण्याची शक्यता आहे.