जिजाऊ उद्यान, सावरकर उद्यान व अथर्व वाटिका सोसायटीत रंगमंच!
By Admin | Updated: July 23, 2014 00:41 IST2014-07-23T00:32:11+5:302014-07-23T00:41:40+5:30
औरंगाबाद : वॉर्ड क. ८४ मध्ये तीन खुल्या रंगमंचांचा लोकार्पण सोहळा औरंगाबाद पूर्वचे आमदार व राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत अत्यंत उत्साहात पार पडला.

जिजाऊ उद्यान, सावरकर उद्यान व अथर्व वाटिका सोसायटीत रंगमंच!
औरंगाबाद : वॉर्ड क. ८४ मध्ये तीन खुल्या रंगमंचांचा लोकार्पण सोहळा औरंगाबाद पूर्वचे आमदार व राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत अत्यंत उत्साहात पार पडला. यावेळी या वॉर्डाचे नगरसेवक पंकज भारसाखळे व शेकडो नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
कल्पतरू सोसायटीतील आदर्श कॉलनीत राष्ट्रमाता जिजाऊ उद्यान, याच सोसायटीतील नाथ प्रांगणातील स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानात व अथर्व वाटिका सोसायटीत हे खुले रंगमंच साकारले गेले. आता यापुढे या भागातील नागरिक सगळे सण, छोटे- मोठे कार्यक्रम उत्साहात या रंगमंचावर साजरे करू शकतील. हे रंगमंच साकारल्याबद्दल राजेंद्र दर्डा यांना या भागातील नागरिकांनी मनोमन धन्यवाद दिले.
पंकज फुलपगर, दामूअण्णा शिंदे, बबन डिडोरे पाटील, राजाराम मोरे, राहुल चव्हाण यांच्यासह आदर्श कॉलनीतील रंगमंचाच्या उद्घाटनप्रसंगी रामेश्वर फुलशंकर, सुंदर सोनवणे, महेश जोशी, गणेश जोशी, रोशन जैन, अॅड. जी. एन. चिंचोलकर, डी. एस. जाधव, प्रभाकर स्वामी आदींसह महिलांची उपस्थिती होती.
नाथ प्रांगण येथील सावरकर उद्यानातील उद्घाटनप्रसंगी महिलांनी राजेंद्र दर्डा यांचे औक्षण केले. चेअरमन शिंदे, काटे, ढवळेकाका, डॉ. बळे, शहा व विनायक डोंगरकर यांनी स्वागत केले. यावेळी सतीश बागडे, पी. जी. कुलकर्णी, राजू सालपे, सुभाष पवार, सुरेश पवार, योगेश मसलगे पाटील, अशोक पगार, रामेश्वर पवार, सुनील डोलारकर,राजू पत्की, लता कस्तुरे, शुभांगी चंद्रात्रे, प्रेमा जगताप, शुभांगी लिंगाडे, निर्मला सालपे, प्रा. शेषराव जाधव, रतन राऊत आदींची उपस्थिती होती. यावेळी राजेंद्र दर्डा यांनी वॉर्ड क्र. ८४ मध्ये त्यांच्या प्रयत्नातून झालेल्या विविध विकासकामांची यादीच वाचून दाखविली.
अथर्व वाटिकेतील उद्घाटनप्रसंगी बाबूलाल जैन, रवींद्र जैन, मधुकर खानोरे, मीरा प्रधान, सुनंदा खरात, बुट्टे, बागूल, पाटील, राऊत, वाघ, चौधरी, जाधव, बोडखे, भंगाळे आदींची यावेळी उपस्थिती होती.
चालता चालता चार कामे मंजूर
एक काम संपले की, दुसरी मागणी लगेच होत असते. कल्पतरू सोसायटीतील अनेक कामे लोकांच्या मागणीनुसार व गरजेनुसार राजेंद्र दर्डा यांनी लीलया करून दिली; पण खुल्या रंगमंचाच्या निमित्ताने राजेंद्र दर्डा आले आहेत, हे कळताच लोकांचे थवेच्या थवे त्यांना भेटायला येत व आपल्या मागण्या मांडत. अशा चार मागण्या त्यांनी चालता चालता मान्य केल्या, हे विशेष होय.