शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

दुबईचा उद्योजक सांगून शेतकऱ्याला ५० लाखांना गंडवणारा ठग निघाला बारावी पास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 14:10 IST

२३ लाखांचा मुद्देमाल जप्त, फसवणुकीच्या रकमेतून एफडी केली, सोने घेतले, पोलिसांकडून अटक

छत्रपती संभाजीनगर : दुबईत विविध कंपन्या असून देशात उद्योग वाढविण्यासाठी कोट्यवधी रुपये मिळवून देण्याचे आमिष दाखवून शहरातील शेतकऱ्याची फसवणूक करणारा अवघा बारावीपर्यंत शिकलेला असल्याचे निष्पन्न झाले आहे. सिडको पोलिसांनी याप्रकरणात सापळा लावून अनिल गोविंदा शिंदे (रा. पाचोरा, जि. जळगाव) यास अटक करत फसवणुकीच्या रकमेतील २३ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

चंद्रभान बापूराव वटाणे (७२, रा. बजाजनगर) यांची २०२१-२२ मध्ये अनिलसोबत आळंदीत ओळख झाली होती. तेव्हा अनिल याने त्याच्या दुबईत कंपन्या असून ५ लाख दिले, तर १५ लाख रुपये देतो, अशी थाप मारली. वटाणे यांचे मित्र गौतम पाईकराव (रा. हातेडी, परतूर) यांची पशुखाद्य निर्मिती करणाऱ्या समर्थ फार्मर नावाने कंपनीसाठी पैशांची गरज होती. त्यामुळे वटाणे यांनी पाईकराव व शिंदेची भेट घडवली. त्याच्यावर विश्वास ठेवत वटाणे, पाईकराव यांनी नातेवाइकांकडून पैसे जमवून दीड कोटी रुपये मिळण्याच्या अपेक्षेने शिंदेला ५० लाख रुपये दिले होते.

१८ मार्च, २०२५ रोजी सकाळी ५० लाख रोख रक्कम हातात पडताच शिंदे शहरातून पसार झाला. सिडको पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांच्या सूचनेवरुन सहायक पोलिस निरीक्षक योगेश गायकवाड यांनी त्याचा शोध सुरू केला. फसवणुकीच्या बहाण्याने तो रविवारी शहरात येत असल्याची माहिती प्राप्त होताच सहायक पोलिस निरीक्षक योगेश गायकवाड, सहायक फौजदार सुभाष शेवाळे, दीपक देशमुख, विशाल सोनावणे यांनी सिडको परिसरात सापळा रचून अटक केली.

म्हणे दुबईत उद्योजक, निघाला बारावी पासस्वत:च्या दुबईत कंपन्या असल्याचे, कोट्यवधी रुपयांची गुंतवणुकीच्या थापा मारणारा शिंदे केवळ बारावी उत्तीर्ण निघाला. विशेष म्हणजे, कंपनीची बनावट कागदपत्रे, आयटी रिटर्नच्या प्रती देखील दाखवल्या. ५०० रुपयांचे दोन कोरे बॉण्डही दिले. पैसे मिळाल्यानंतर सोशल मीडियावर नोटांच्या बंडलचे स्टेटसही ठेवले. ५० लाखांतून त्याने २ सोन्याच्या अंगठ्या, दीड लाखांचा मोबाईल खरेदी केला. १० लाखांची एफडी केली. या ऐवजासह त्याच्या ताब्यातून १० लाख रोख जप्त करण्यात आले. उर्वरित रोख रकमेसह त्याने आणखी कोणाला फसवलेय का, याचा तपास सुरू असल्याचे सहायक निरीक्षक गायकवाड यांनी सांगितले.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारी