शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत महामॅरेथॉनचा थरार; छत्रपती संभाजीनगरकर करणार धावण्याचा विक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 13:16 IST

लोकमत महामॅरेथॉनचा थरार; धावण्यासाठी हजारो धावपटू झाले आतुर

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरकरांसाठी आरोग्य आणि अभिमानाचा केंद्रबिंदू ठरलेली ‘लोकमत महामॅरेथॉन’ १५ डिसेंबर रोजी विभागीय क्रीडा संकुल येथे रंगणार आहे. यंदा महामॅरेथॉनचे हे आठवे पर्व असून, प्रत्येक पर्वागणिक सहभागी धावपटूंचा सहभागी होण्याचा ग्राफ उंचावत आहे. त्यामुळे यंदाही हा ग्राफ आणखी उंचावणार असून, लोकमत महामॅरेथॉनमध्ये छत्रपती संभाजीनगरकर धावण्याचा विक्रम नोंदविण्यासाठी सज्ज झाले आहेत.

बालगोपाळांपासून वृद्ध आणि राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा चैतन्यपूर्ण सहभाग, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल ही वैशिष्ट्ये असणारी महामॅरेथॉन ३ कि.मी., ५ कि.मी. आणि २१ कि.मी. अंतरात होत आहे. तब्बल १२ लाख रुपयांपर्यंत पारितोषिके असणारी ही महामॅरेथॉन यंदा सखी मंच, कॅम्पस क्लबसाठी आकर्षण ठरणार आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे १५ डिसेंबर रोजी होणाऱ्या महामॅरेथॉनमध्ये नागरिकांना कुटुंबासोबत धावण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

निरोगी आरोग्यासाठी व्यायामाचा श्रीगणेशा करणाऱ्यांसाठीदेखील ही मॅरेथॉन मैलाचा दगड ठरणार आहे. याचे कारण म्हणजे ज्यांना धावण्याची सुरुवात करायची आहे त्यांच्यासाठी ३ व ५ कि.मी. हे अंतर असणार आहे. १२ पेक्षा जास्त वय असणाऱ्यांसाठी ५ कि.मी. अंतराच्या ‘फन रन’चा यात समावेश आहे. तसेच प्रोफेशनल धावपटूंसाठी २१ कि.मी. अंतर असणार आहे.

महामॅरेथॉनमध्ये एक मोठा उत्सव ज्यांना व्यायामाकडे वळायचे आहे ते १ जानेवारीचा मुहूर्त पाहत असतात. त्यांच्यासाठी महामॅरेथॉन एक पर्वणी आहे. ते लोकमत महामॅरेथॉनमध्ये ३ कि.मी.त सहभागी होऊ शकतात. पूर्ण कुटुंबासह या महामॅरेथॉनमध्ये धावता येत असल्याने हा एक मोठा उत्सव बनला आहे. त्याचप्रमाणे महामॅरेथॉनमध्ये जे मेडल मिळते ते तुम्हाला व्यायाम करण्यासाठी प्रेरित करते.- नितीन घोरपडे

आयर्नमॅन व क्रीडा संचालक, एमजीएम‘लोकमत समूहा’ने महामॅरेथॉनचे आयोजन करून धावपटूंना एक चांगले व्यासपीठ मिळवून दिले आहे. लोकमत महामॅरेथॉनचे आयोजन हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे असते. या महामॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी देशभरातील धावपटू आतुर असतात. आता लोकमत समूहाने बोस्टन, न्यू यॉर्क यासारख्या जगातील अव्वल मॅरेथॉनच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन सुरू करावी.- दयानंद कांबळे

आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स पंचशहरातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ होण्यासाठी लोकमत समूह महामॅरेथॉनच्या माध्यमातून स्तुत्य उपक्रम राबवत आहे. ७ वर्षांपासून ॲडव्हान्स फिजियोज हब हे महामॅरेथॉनमध्ये फिजियो पार्टनर आहे. आम्ही वैज्ञानिक दृष्टिकोनातून धावण्यासाठी धावपटूंना मदत करतो. महामॅरेथॉनमध्ये मॅन्युअल थेरेपी, फूट, असिसमेंट असे उपक्रम आम्ही राबवत असतो.- प्रशांत पारधे, फिजियो

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरMarathonमॅरेथॉन