छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरकरांसाठी आरोग्य आणि अभिमानाचा केंद्रबिंदू ठरलेली ‘लोकमत महामॅरेथॉन’ १४ डिसेंबर रोजी विभागीय क्रीडा संकुल येथे रंगणार आहे. डॉ. भाले लाइफलाइन मेडिकल डिव्हायसेस प्रस्तुत व पॉवर्ड बाय मिसेस फूड राइट व अदानी समूह लोकमत महामॅरेथॉनचे यंदा नववे पर्व आहे. महामॅरेथॉनच्या आदल्या दिवशी म्हणजे शनिवारी मान्यवरांच्या उपस्थितीत ‘बिब एक्स्पो’चे आयोजन करण्यात आले आहे.
लोकमत भवन येथील हॉलमध्ये या एक्स्पोला शनिवारी सकाळी १० वाजता सुरुवात होणार आहे. हा सोहळा सायंकाळी ६ वाजेपर्यंत होणार आहे. यावेळी सहभागी धावपटूंना रनर किटचे वाटप होणार आहे. रनर किट घेण्यास येणाऱ्यांना शनिवारी ‘लोकमत भवन’मध्ये जवाहरलाल दर्डा मार्गावरील प्रवेशद्वारानेच सर्वांना प्रवेश दिला जाणार आहे.
लोकमत समूह आयोजित भव्य ‘महामॅरेथॉन’ उपक्रमाचे टायटल स्पॉन्सर म्हणून सहभागी होणे माझ्यासाठी शब्दातीत आनंद आणि अभिमानाची गोष्ट आहे. आजच्या वेगवान आणि ताणतणावाच्या जगात, समाजाशी जिव्हाळ्याचं नातं जपणं, सकारात्मक उपक्रमांना खंबीर पाठबळ देणे आणि विचारांना संवेदनशीलपणे वाचकांपर्यंत पोहोचवणं ही ‘लोकमत’ची खरी ओळख, त्यांची ताकद आणि परंपरा आहे. या महामॅरेथॉनद्वारे आरोग्य, एकजूट आणि प्रेरणा यांचा संदेश दूरदूरपर्यंत पोहोचवण्यामध्ये आम्हालाही योगदान देता येत असल्याचा मला विशेष आनंद आहे.- विशाल भाले, डायरेक्टर, लाईफलाईन मेडिकल डिव्हाइसेस प्रा. लि.
लोकमत महामॅरेथॉनसारख्या प्रेरणादायी उपक्रमाशी जोडले जाणे हा मनजीत प्राईड ग्रुपसाठी अभिमानाचा क्षण आहे. आमचे वन वर्ल्ड आणि ड्रीम वर्ल्ड हे प्रकल्प या वर्षीच्या अधिकृत टी-शर्ट प्रायोजक म्हणून सहभागी होत आहेत, याचा आम्हाला आनंद आहे. आरोग्य, शिस्त आणि समुदायातील सकारात्मक बदल यांना प्रोत्साहन देणाऱ्या प्रत्येक उपक्रमासोबत उभे राहणे हा आमचा नेहमीच दृढ संकल्प राहिला आहे.- नवीन बगाडिया, डायरेक्टर, मनजीत प्राईड ग्रुप
समाजाच्या उन्नतीसाठी घेतल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये एमजीएम विद्यापीठाचा नेहमीच पुढाकार राहिलेला आहे. लोकमत महामॅरेथॉनच्या माध्यमातून सर्वच वयोगटातील नागरिकांना आरोग्याप्रती जागरूक करणे या उद्देशाने एमजीएम विद्यापीठ या उपक्रमात सहभागी झाले आहे. या मॅरेथॉनमध्ये एमजीएमचे १०० पेक्षा जास्त अधिकारी, कर्मचारी, प्राध्यापक व विद्यार्थी सहभागी होत आहेत. मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना मनस्वी शुभेच्छा!- प्रा. डॉ. विलास सपकाळ, कुलगुरू, एमजीएम विद्यापीठ,छत्रपती संभाजीनगर
मॅरेथॉन म्हणजे तंदुरुस्ती, शिस्त आणि उत्साहाचा उत्सव. १४ डिसेंबर २०२५ रोजी होणाऱ्या या धावण्याच्या स्पर्धेसाठी सर्व धावपटूंना मनःपूर्वक शुभेच्छा! उन्हाळे करिअर अकॅडमी (UCA) तर्फे सर्व रनर्सना ऑल द बेस्ट. विशेषतः आपल्या लिटिल चॅम्प्सना उज्ज्वल कामगिरीसाठी खूप खूप शुभेच्छा!- चंद्रकांत उन्हाळे, संचालक, उन्हाळे करिअर अकॅडमी
Web Summary : Lokmat Mahamarathon, a health and pride event, will be held on December 14th. The Bib Expo, featuring runner kit distribution, precedes it. Sponsors express pride in supporting the marathon, emphasizing health, unity, and community engagement. MGM University participates with staff and students, wishing runners success.
Web Summary : लोकमत महामैराथन, स्वास्थ्य और गौरव का कार्यक्रम, 14 दिसंबर को आयोजित होगा। धावक किट वितरण के साथ बिब एक्सपो का आयोजन किया गया है। प्रायोजकों ने मैराथन का समर्थन करने पर गर्व व्यक्त किया, स्वास्थ्य, एकता और सामुदायिक जुड़ाव पर जोर दिया। एमजीएम विश्वविद्यालय कर्मचारियों और छात्रों के साथ भाग ले रहा है, धावकों को सफलता की शुभकामनाएं।