शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांना मंदिराची घंटाही पुरेना, पिंडीवरील नाग ही चोरला; पण पळून जाताना पोलिस आडवे आले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 19:25 IST

घंटा, दिवा, समई, तांब्याचा कलश, पिंडीवरील नाग असे चोरून चोरट्यांनी पळ काढला

सिल्लोड (औरंगाबाद) : अजिंठा येथील रांजनीच्या नाल्यावर असलेल्या हनुमान व महादेव मंदिरातील घंटा, दोन पितळी समई, तांब्याचा कलश व मुक्तेश्वर येथील महादेव मंदिरातील कलश, पितळी दिवा, घंटा व महादेवाच्या  पिंडीवरील नाग देखील चोरीला गेल्याचे मंगळवारी सकाळी उघडकीस आले. दरम्यान, पळून जाणारे चोरटे जळगाव जिल्ह्यातील पहूर पोलिसांनि पाठलाग करून ताब्यात घेतले आहेत. अमजद शहा कादर शहा  आणि अक्रम शहा मोहमद शहा (दोघे रा.जामनेर ) असे आरोपींची नावे आहेत. 

मंगळवारी सकाळी दिलीप झलवार हे रांजनी शिवारातील हनुमान व महादेव मंदिरात दर्शनासाठी आले होते. यावेळी त्यांना मंदिरात घंटा आणि इतर साहित्य चोरीस गेल्याचे आढळून आले. याच प्रकारे मुक्तेश्वर येथील महादेव मंदिरात भास्कर सूर्यवंशी यांना सकाळी दर्शनासाठी गेल्यानंतर चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी अजिंठा पोलीस ठाणे गाठून तक्रार केली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

असे अडकले आरोपी...सदर चोरट्यानी दोन्ही मंदिरात चोरी केली व ते चोरीचा ऐवज जामनेर येथे बाईकवर घेऊन  जात होते. समोरून पहुर पोलिसांचे वाहन बघून त्यांनी बाईकचा वेग वाढवला. यामुळे संशय आल्याने पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडले. यावेळी पोत्यातील मुद्देमाल पाहून पोलिसांनी त्यांची चौकशी केली. चोरट्यांनी अजिंठा येथील दोन्ही मंदिरात चोरी केल्याची कबुली दिली.

अजिंठा पोलिसांच्या स्वाधीन इकडे अजिंठा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. पोलीस चोरट्यांना शोधण्याचा प्रयत्न करत असताना पहुर पोलिसांनी त्यांना संपर्क केला.अजिंठा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अजित विसपुते व कर्मचाऱ्यानी तात्काळ आरोपींना ताब्यात घेतले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादtheftचोरीCrime Newsगुन्हेगारी