शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील बड्या हॉटेल्सच्या नळ कनेक्शनची होणार तपासणी; प्रभारी प्रशासक चव्हाण यांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 19:34 IST

जायकवाडी धरणातून १३५ ते १४० एमएलडी इतका पाणीउपसा होतो.

औरंगाबाद : जायकवाडी ते नक्षत्रवाडी व तेथून पुढे शहरात येणाऱ्या मुख्य जलवाहिनीवरून ज्यांना नळजोडण्या दिल्या आहेत, अशा सुमारे एक ते दीड हजार नळधारकांना वॉटरमीटर बसविण्यात येणार असल्याचे प्रभारी महापालिका प्रशासक तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सोमवारी सांगितले.

महापालिकेचे नियमित प्रशासक रजेवर गेल्यामुळे चव्हाण यांच्याकडे पदभार आहे. त्यांनी पाणीपुरवठ्यातील अडचणी, उपाययोजना, टँकरने होणारा पाणीपुरवठा, विहिरींचे अधिग्रहण याबाबत आढावा बैठक घेतली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले, मुख्य जलवाहिनीवरून १० ते १२ तास पाणीपुरवठा सुरू असतो. या जलवाहिनीवरून ज्यांनी नळ घेतलेले आहेत, त्यांना मीटर बसविण्यात येईल. जेवढे पाणी वापरतील, तेवढे पैसे त्यांना द्यावे लागतील. तसेच मोठ्या हॉटेलधारकांच्या नळ कनेक्शनची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. सध्या ५ दिवसांआड पाणीपुरवठा होतो आहे, त्यात बदल करण्याबाबत रविवारी चर्चा केली. शहराची पाण्याची गरज २०० एमएलडीच्या पुढे आहे.

मुख्य जलवाहिनीतून ढोरकीन, इसारवाडी, धनगाव या गावांना पाणीपुरवठा होतो. या जोडण्यांना मीटर लावण्यात आले आहेत. या गावांना दोन दिवसांआड पाणीपुरवठा सुरू आहे. फारोळा शुद्धीकरण केंद्रातून कृष्णपूरला ४० हजार लीटर पाणी दर दोन दिवसांआड पुरविण्यात येते. त्यावर नियंत्रण करण्याचे आदेश देण्यात आल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

सध्या शहराला मिळणारे पाणी असेजायकवाडी धरणातून १३५ ते १४० एमएलडी इतका पाणीउपसा होतो.फारोळा येथून शुद्ध होऊन १२५ एमएलडी पाणी सिडको व शहरासाठी जाते.८५ टँकरद्वारे ४०० खेपा करून ३ एमएलडी पाणीपुरवठा होतो.एन-१ येथील एमआयडीसी पंपगृहातून सुमारे २.२५ एमएलडी पाणी मिळते.मगरबी कम्पाउंड जहाँगीर कॉलनीतील २ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.हर्सूल तलावातून ७.५ एमएलडी, नहरीतून ०.७ एमएमडी पाणी मिळते.शहरासाठी सर्व मिळून १३६.१५ एमएलडी पाणी आणले जाते.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी