शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

सगळा आलबेल कारभार, बनावट रजिस्ट्री प्रकरणात मुद्रांक विभागाने झटकले हात

By विकास राऊत | Updated: July 27, 2024 19:53 IST

सामान्यांची कुणीही करू शकते फसवणूक

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा मुद्रांक नोंदणीच्या १३ कार्यालयांमध्ये भूखंड, जमिनीची व इतर मालमत्तेची रजिस्ट्री बोगस व्यक्ती अथवा बनावट कागदपत्रांच्या आधारे होणे शक्य आहे. त्यामुळे सामान्यांची मालमत्ता खरेदी-विक्री प्रकरणात फसवणूक झाल्यास संबंधित विभाग काहीही करू शकत नाही, असे सांगून मुद्रांक विभागाने पोलिसांना दिलेल्या लेखी तक्रारीत हात झटकले आहेत. कागदपत्रांची सत्यता पडताळणीची जबाबदारी विभागाची नाही, किंबहुना विभागाला तसे अधिकारही नाहीत. या बाबीखाली विभागाने अंग काढून घेतल्यामुळे आता नागरिकांनाच मालमत्ता घेण्यापूर्वी सर्च रिपोर्ट (शोध अहवाल) घेऊनच खरेदी-विक्रीचा व्यवहार करावा लागेल. 

बीड बायपास येथील मुद्रांक नोंदणी कार्यालयात चिकलठाण्यातील लाखो रुपये किमतीच्या एका भूखंडाची मार्चमध्ये रजिस्ट्री झाली. त्याच भूखंडाची बनावट आधार कार्डच्या आधारे दुसरी रजिस्ट्री जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक १ मध्ये मे महिन्यातही झाली. हा खळबळजनक प्रकार ‘लोकमत’ने २२ जुलै रोजी वृत्तमालिकेतून उघडकीस आणला. या प्रकरणाच्या पूर्ण चौकशीअंती मुद्रांक विभागाने २५ जुलै रोजी पाच जणांविरोधात सिटीचौक पाेलिसांत तक्रार केली आहे. त्यावरून पोलिसांनी पाच जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. सगळा प्रकार समोर आल्यानंतरही बनावट रजिस्ट्री प्रकरणाला मुद्रांक विभाग गांभीर्याने घेत नसल्याचे दिसत आहे.

सत्यता पडताळणीचे अधिकार नाहीत...नोंदणी अधिनियम १९०८, महाराष्ट्र नोंदणी नियमानुसार व न्यायालयाच्या आजवरच्या निर्णयानुसार दुय्यम निबंधकांना दस्तऐवजातील मिळकतीचे मालक व मालकी हक्काची चौकशी व त्यासोबत जोडलेल्या पुराव्यांची वैधता तपासण्याचे अधिकार नाहीत. मात्र, नोंदणी करताना खोटे कागदपत्र, बनावट व्यक्ती आढळून आल्यास फौजदारीचे अधिकार आहेत, असे दुय्यम निबंधक बालाजी मादसवार यांनी पाेलिसांत दिलेल्या तक्रारीत स्पष्ट केले आहे. चिकलठाण्यातील गट नं. ३६८ मधील ९ हजार ३७२ चौ. फूट भूखंडाची रजिस्ट्री होताना मूळ मालक बोगस आहे की नाही, साक्षीदार कोण आहेत, आधार कार्ड लिंक झाले नसताना रजिस्ट्री कशी केली. हे सांगण्याऐवजी कागदपत्रांची, व्यक्तीची वैधता तपासण्याचे अधिकार नसल्याचे सांगून विभागाने अंग काढून घेतले आहे.

सर्च रिपोर्ट म्हणजे काय?महसूल यंत्रणेतून मालमत्ता खरेदी-विक्रीपूर्वी संबंधित मालमत्तेचा सर्च रिपोर्ट काढून घेणे गरजेचे आहे. १३ वर्षांत त्या मालमत्तेचे किती व्यवहार झाले. सातबारावर किती फेर झाले, मूळ मालक कोण आहेत. अलीकडच्या काळात खरेदी-विक्री झाली आहे काय, या सगळ्या बाबी त्यातून स्पष्ट होतात. वकिलामार्फत सर्च रिपोर्ट काढता येतो. बोगस आधार कार्ड, भूखंडाचा बोगस मालक उभा करून मुद्रांक विभागात रजिस्ट्री होत असेल तर सामान्य नागरिकांना आता मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार करताना बारकाईने काळजी घ्यावी लागणार आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRevenue Departmentमहसूल विभागAurangabadऔरंगाबाद