शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

रेणुकादेवी शरद कारखान्याची सूत्रे पुन्हा संदीपान भुमरेंच्या हातात; १४ संचालक बिनविरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2023 19:22 IST

रेणुकादेवी शरद सहकारी साखर कारखाना निवडणूक; मविआच्या १० उमेदवारांचे अर्ज ठरले अवैध

पैठण: उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्याच्या  निर्णयास आव्हान देणारा अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळल्याने रेणुकादेवी शरद सहकारी साखर कारखाना निवडणुकीत पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या गटाचे १४ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी मुकेश बारहाते यांनी याबाबत बुधवारी अधिकृत घोषणा केली आहे.

रेणुकादेवी शरद सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी भरलेले महाविकास आघाडी गटाचे १० उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी मुकेश बारहाते यांनी अवैध ठरविले होते. या निर्णया विरोधात साखर आयुक्तांकडे या दहा उमेदवारांनी दाद मागितली तेथेही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय योग्य ठरविण्यात आला. यामुळे न्यायालयात हे प्रकरण दाखल करण्यात आले. निवडणूक प्रक्रिया पुढे सरकल्याने न्यायालय यात हस्तक्षेप करू शकत नाही असे मत मांडून उमेदवारांचा अर्ज उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावला. यामुळे १४ संचालकांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला होता.

दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नितीन तांबे, ब्रम्हदेव नरके व भिमराव वाकडे (टाकळी अंबड गट). अक्षय डुकरे, दिलीप बोडखे व अफसर शेख ( विहामांडवा गट). सुभाष गोजरे, अमोल थोरे, नंदू पठाडे ( चौंढाळा गट). सुभाष चावरे, भरत तवार व विलास भुमरे ( कडेठाण गट). सहकारी संस्था मतदार संघातून राजूनाना भुमरे व अनुसूचित जाती जमाती मतदार संघातून कल्याण धायकर हे १४ उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचे घोषित केले. दरम्यान हे सर्व उमेदवार पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या गटाचे आहेत. १४ संचालक बिनविरोध झाल्याने आता सात संचालकाच्या निवडीसाठी निवडणूक होणार आहे. दहा उमेदवार अवैध ठरल्यानंतरही निवडणूक ताकतीने लढू असे महाविकास आघाडीचे दत्ता गोर्डे यांनी सांगितले. रेणुकादेवी शरद सहकारी साखर कारखान्याच्या सात संचालकाच्या निवडीसाठी दि २५ जून रोजी मतदान घेण्यात येणार असून १४ उमेदवार रिंगणात आहेत.

टॅग्स :Sandipan Bhumreसंदीपान भुमरेAurangabadऔरंगाबादSugar factoryसाखर कारखाने