शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

इंदूरचा गुलाब अन् राजस्थानच्या गुलालाची उधळण; धुलीवंदनानिमित्त नाथ मंदिरात फाग उत्सव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 17:57 IST

दहा क्विंटल फुलांची उधळण करीत नाथमंदीरात फाग उत्सव साजरा... 

- संजय जाधवपैठण: राधाकृष्णांच्या होळी गिताच्या जल्लोषात राजस्थान नाथद्वाराच्या विशेष गुलालासह लाखो गुलाब पाकळ्यांची उधळण करून मंगळवारी धुलीवंदनानिमित्ताने नाथांच्या मंदिरात आगळा वेगळा 'फाग उत्सव' साजरा करण्यात आला. फाग उत्सवात गुलालाची व फुलांची उधळण करण्यासाठी मोठ्या संख्येने महिला व पुरूष भाविकांनी हजेरी लावल्याने मंदिर खचाखच भरले होते. विविध रंगाची उधळण करत सर्वत्र रंगपंचमी साजरी करण्यात येते. मात्र पैठण येथील नाथांच्या मंदीरात रंगा ऐवजी विविध फुलांची उधळण करून ' फाग उत्सव ' साजरा करण्यात आला. 

होळी उत्सवा संबंधी मराठी, ब्रजभाषा, हिंदी, राजस्थानी आदि भाषांचे विविध भजन, गवळणीचे गायन करण्यात आल्याने मंदिरात जल्लोष पूर्ण वातावरण तयार झाले.  नाथ मंदिरात रंगाच्या ऐवजी फुलांच्या पाकळ्या उधळून रंगपंचमी साजरी होते. यासाठी यंदा सुगंधीत चैत्री गुलाब इंदौर, जालना, सांगली, पुणे अशा विविध भागातून मागवण्यात आला होता. तर  गुलालाची उधळण करण्यासाठी विशेष गुलाल नाथद्वारा (राजस्थान) येथून आणला होता. मंगळवारी दहा क्विंटल फुले उधळून मंदिरात फाग महोत्सव साजरा करण्यात आला असे गोवत्स परिवाराचे गणेश महाराज लोहीया यांनी सांगितले.  फाग उत्सवात बद्री महाराज नवल,  किशोर चौहान,आनंद लोहिया,पवन लोहिया, नाथवंशज मिलिंद गोसावी, श्रेयस गोसावी, पुष्कर गोसावी,परीक्षीत गोसावी,पुष्कर लोहिया,योगेश लोहिया,बलराम लोळगे, विनय रावस, हार्दिक सराफ, गणेश लोहिया,श्रीकांत सारडा, मधुसूदन मुंदडा, आदीसह मोठ्या संख्येने भाविकांनी सहभागी होऊन आनंद लुटला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHoliहोळी 2023