रब्बी हंगाम संपत आला; पीककर्ज कधी मिळणार ?

By प्रशांत तेलवाडकर | Published: February 28, 2024 11:33 AM2024-02-28T11:33:08+5:302024-02-28T11:35:01+5:30

रब्बी हंगाम संपत असून, बळीराजा एक ते दोन महिन्यांनंतर खरीप हंगामाच्या तयारीला लागेल.

The Rabbi season is coming to an end; When will peak loan be available? | रब्बी हंगाम संपत आला; पीककर्ज कधी मिळणार ?

रब्बी हंगाम संपत आला; पीककर्ज कधी मिळणार ?

छत्रपती संभाजीनगर : नवीन गहू, ज्वारीचे अडत बाजारात आगमन झाले आहे. सुरुवातीला आवक कमी असली तरी पुढील महिन्यात आवकमध्ये मोठी वाढ होईल. रब्बी हंगाम संपत असून, बळीराजा एक ते दोन महिन्यांनंतर खरीप हंगामाच्या तयारीला लागेल. दुसरीकडे अजूनही अनेक शेतकरी असे आहेत की, त्यांना पीक कर्जाची रक्कम मिळाली नाही, अजूनही प्रतीक्षा सुरू आहे.

रब्बीची १०७ टक्के पेरणी
पावसाळ्यातील शेवटच्या टप्प्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे रब्बी पेरणीला वेग आला होता. छत्रपती सरासरी पेरणी क्षेत्र १३६८३० हेक्टर आहे. त्यापैकी प्रत्यक्ष पेरणी १४६५८९ हेक्टरवर पेरणी झाली आहे. एकूण १०७.३ टक्के पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली.

उद्दिष्ट ८११ कोटींचे, वाटप केवळ २५० कोटी
रब्बी हंगामात बँकांना ११६००० शेतकऱ्यांना ८११ कोटींचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. प्रत्यक्षात त्यापैकी फक्त २६ हजार शेतकऱ्यांना २५० कोटींचे पीककर्ज वाटप झाले. ६१ टक्केच उद्दिष्ट बँकांना पूर्ण करण्यात यश आले.

कोणत्या बँकेला किती उद्दिष्ट देण्यात आले होते.
बँक             सभासद कर्ज

राष्ट्रीयीकृत बँका ४०८०० ३२७ कोटी
खाजगी बँका ११८०० ८४ कोटी
जिल्हा बँक ५०००० २९७ कोटी
ग्रामीण बँक १३४००            १०३ कोटी

कोणत्या बँकांनी प्रत्यक्षात किती पीककर्ज वाटप केले
बँक सभासद कर्जवाटप

राष्ट्रीयीकृत बँक १६००० १३७ कोटी
खाजगी बँक १४७२ ४७ कोटी
जिल्हा बँक : ५००० २१ कोटी
ग्रामीण बँक : १२२१ १२ कोटी

त्यामुळे नवीन पीक कर्ज वाटप कमी
आतापर्यंत १.७८ लाख शेतकऱ्यांनी १९०० कोटी रुपयांची पीककर्जाची परतफेड केली नाही. यामुळे बँकांना पीक कर्ज वाटपात उद्दिष्ट पूर्ण करता आले नाही. वार्षिक आधारावर केवळ ५ ते ८ टक्के शेतकरी आहेत जे पीक कर्जासाठी अर्ज करतात. जोपर्यंत विद्यमान शेतकरी त्यांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड करत नाहीत तोपर्यंत पीक कर्जाचे उद्दिष्ट पूर्ण करणे बँकांना अशक्य आहे.
- मंगेश केदार, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक

Web Title: The Rabbi season is coming to an end; When will peak loan be available?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.