शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
4
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
5
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
6
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
7
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
8
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
9
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
10
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
11
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
12
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
13
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
14
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
15
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
16
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?
17
३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक
18
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
19
Royal Enfield ने जारी केली यादी; Hunter, Classic, Meteor..; पाहा सर्व गाड्यांची नवी किंमत

भुरट्या चाेरांचीच ‘समृद्धी’; सोलार बॅटरी, स्पीड बोर्ड, रेडियमची चोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 12:34 IST

महामार्गावर सोलार बॅटरी, स्पीड बोर्ड, रेडियमची चोरी

विकास राऊतछत्रपती संभाजीनगर : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर वाहतुकीच्या दृष्टीने बसविण्यात आलेले सोलार बल्ब, बॅटऱ्या, स्पीड बोर्ड, रेडियम, लोखंडी बॅरिकेड्स यांच्या चोऱ्यांचे सत्र सुरू झाले आहे. एमएसआरडीसी अधीक्षक अभियंत्यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ११० किमीच्या हद्दीतील चोऱ्यांचे सत्र थांबविण्यासाठी पोलिस आयुक्त, अधीक्षकांकडे तक्रार केली आहे. सोलापूर-धुळे महामार्गावरही अशाच चोऱ्यांचे सत्र वाढले आहे. एनएचएआयने याबाबत पोलिसांत तक्रारी दिल्या आहेत.कशी आहे मोडस ऑपरेंडी?

१० ते २० रुपयांना मिळणाऱ्या हेक्सा ब्लेडने लोखंडी बॅरिकेड्स कापण्यात येतात. हॅण्ड कटरने तार तोडून ती गोळा करून एका टेम्पोमध्ये टाकली जाते. कंपाउंड वॉलच्या पलीकडे टेम्पो उभा असताे. सहा ते सात जणांची टोळी नियोजनबद्धरीत्या चोऱ्या करते. या चाेऱ्यांमुळे अपघाताचा धाेका वतर्वला जात असून चाेरांना तत्काळ अटक करण्याची मागणी चालक करत आहेत.

बॅटऱ्या चोरीमुळे मार्गावर अंधार... बॅटऱ्या चोरीस जात असल्याने महामार्गावर अंधार पडतो. दोन लाखांची एक बॅटरी आहे. सोलार एनर्जी त्यात साठवली जाते.  मेघा इंजिनिअरिंगकडे मार्गाची देखभाल व दुरुस्ती चार वर्षांसाठी आहे. त्यामुळे ते चोरीस गेलेले साहित्य बसवतात. परंतु, ते पुन्हा चोरीस जाते.  स्पीड किती असावा याचे फलक, लोखंडी बॅरिेकेड्स, रिफ्लेक्टर रेडियम ६० किमीपर्यंत चोरीस गेले आहेत. यामुळे अपघातांमध्ये वाढ होण्याची भीती आहे.

चोऱ्या कुठे?वैजापूर आणि गंगापूर परिसरातून गेलेल्या पट्ट्यात सर्वाधिक चोऱ्यांचे प्रमाण आहे. बेंदेवाडी ते सुराळा या पट्ट्यातील महामार्गावर बॉण्ड्री, साइड कंपाउंड वॉल, झाडे तोडणे, साहित्याची चोरी होत असल्याची तक्रार एमएसआरडीसीने पोलिस प्रशासनाकडे केली.

दीड टन संरक्षक जाळ्या चोरीलाकाही महिन्यांपूर्वी दीड किमीपर्यंतच्या लोखंडी संरक्षक जाळ्या चोरीला गेल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी चिकलठाणा पोलिसांत तक्रारही करण्यात आली आहे. जालना जिल्ह्यातून आलेल्या टेम्पोतून पाच ते सहा जण महामार्गावरील संरक्षक जाळ्या कापत होते, अशी माहिती आहे.

 

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गThiefचोर