शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

कोथिंबीर जुडीचा भाव पाचोडात ५० पैसे तर छ. संभाजीनगरात २० रुपये, शेतकऱ्यांच्या हाती किती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 11:53 IST

पाचोडच्या आठवडी बाजारात शेतमालास मातीमोल भाव : संतप्त शेतकऱ्याने रस्त्यावर फेकली कोथिंबीर

पाचोड/छत्रपती संभाजीनगर : पाचोडच्या रविवार आठवडी बाजारात कोथिंबिरीच्या एका जुडीला ५० पैसे ते १ रुपयांचा दर मिळत असल्याने केकत जळगाव येथील संतप्त शेतकऱ्याने रस्त्यावर सर्व कोथिंबीर फेकल्याची घटना सकाळी नऊ वाजता घडली. तोच छत्रपती संभाजीनगरातील आठवडी बाजारात कोथिंबिरीची लहान जुडी १०, तर मोठी जुडी तब्बल २० रुपयाला विकली जात होती.

केकत जळगावचे गणेश अजिनाथ थोरे यांना नऊ एकर शेती आहे. खरीप व रब्बी हंगामातील प्रमुख पिकांना चांगला भाव मिळत नसल्यामुळे यंदा भाजीपाला लागवड करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी शेतात एका एकरावर कोथिंबीरची लावगड केली. मेहनत, मशागत, पाणी, खते वापरून कोथिंबीर पिकविली. वाहतुकीचा मोठा खर्च करून कोथिंबीर पाचोडच्या आठवडी बाजारात विक्रीसाठी आणली; मात्र बाजारात कोथिंबिरीला केवळ ५० ते १०० रुपये प्रतिशेकडा असा तोकडा दर व्यापारी देऊ करीत होते. 

परिणामी, एक जुडी केवळ ५० पैसे ते १ रुपया दराने विकावी लागणार होती. या दरात विक्री केल्यास उत्पादन खर्च तर सोडाच, मजुरी व वाहतुकीचा खर्चही निघत नाही, असा संताप व्यक्त करीत गणेश थोरे यांनी आपल्या गाठोड्यातून कोथिंबीर काढून रस्त्यावर फेकून दिली आणि रिकाम्या हाताने घराकडे परतले.

शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाटया घटनेमुळे बाजार परिसरात आणि शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली. ‘शेतात अतोनात मेहनत करूनही पिकाला भाव मिळत नसेल, तर शेती कशी टिकेल ?’ असा सवाल अनेक शेतकऱ्यांनी उपस्थित केला. उत्पादन खर्च वाढत असतानाही बाजारभाव मात्र दरवर्षी घसरतच आहे. शासनाने भाजीपाला उत्पादकांसाठी किंमत हमी योजना राबवावी, अशी मागणी या निमित्ताने जोर धरू लागली आहे.

नाशिकहून भाजीपाला येतोसध्या सतत पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील भाजीपाला खराब झाला आहे. पाचोडला तीच कोथिंबीर बाजारात आल्याने त्याला भाव मिळाला नाही. शहरात नगर, नाशिकहून भाजीपाला येतो. आम्हाला मोठी जुडी १० रुपयाला मिळते. ती किरकोळामध्ये २० रुपयाला जाते.- संजय वाघमारे, शहरातील भाजी विक्रेता

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी