शहरं
Join us  
Trending Stories
1
जैसलमेर दुर्घटनेतील मृतांचा आकडा २० वर; मोदींकडून दुःख व्यक्त, आर्थिक मदतीची घोषणा
2
जनरल झेडच्या आंदोलनामुळे आणखी एका देशात सत्तापालट!
3
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
4
'२५ हजार दिल्याशिवाय पेन्शन नाही!' रेल्वेच्या लाचखोर मुख्य अधीक्षकाला रंगेहाथ पकडलं
5
रुग्णालयात नेताना आजारी मुलाचा वाटेतच मृत्यू; धक्क्याने वडिलांनीही सोडले प्राण!
6
अमरावती-गडचिरोली मार्गावर २२० क्विंटल 'पोर्टिफाईड तांदूळ' घेऊन जाणारा ट्रक पकडला
7
आरमोरी मार्गावर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दोन भाऊ जागीच ठार!
8
सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक'
9
निवडणूक न लढवताही कार्यकर्ते झेडपी, पंचायत समितीचे सदस्य बनणार? बावनकुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
10
भारत-पाक सामना बरोबरीत सुटला! मग दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये जे घडलं ते चर्चेत
11
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
12
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
13
‘पात्र गावांना सामूहिक वनहक्क देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी’, अजित पवार यांचे आदेश
14
IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?
15
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
16
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
17
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
18
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
19
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
20
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   

अतिरिक्त वाळूज एमआयडीसीसाठीच्या आरापूर जमिनीचा दर दिवाळीनंतर ठरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 18:08 IST

दिवाळीनंतर शेतकऱ्यांसोबत वाटाघाटीसाठी बैठक होणार

छत्रपती संभाजीनगर : शासनाने वाळूजपासून जवळच असलेल्या आरापूर येथे नवीन औद्योगिक वसाहत विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. आरापूरसह तीन गावांतील जमीन एमआयडीसी प्रशासन संपादीत करणार आहे. या जमिनीचा दर ठरवून ती संपादीत करावी लागणार आहे. जमिनीचा दर ठरविण्यासाठी एमआयडीसी दिवाळीनंतर शेतकरी व स्थानिक लोकप्रतिनिधींसोबत बैठक घेणार असल्याचे एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी अमित भामरे यांनी सांगितले.

जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या वाळूज औद्योगिक वसाहतीमध्ये एकही भूखंड शिल्लक नाही. परिणामी मागणी करूनही उद्योजकांना तेथे भूखंड मिळत नाहीत. परिणामी शेकडो उद्योजकांनी खासगी जमिनीवरील भूखंड विकत घेऊन तेथे उद्योग थाटले आहेत. अजूनही भूखंडाची मागणी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर उद्योग विभागाने अतिरिक्त वाळूज या नावाने आरापूर एमआयडीसी विकसित करण्याचा निर्णय घेतला. यासाठी ७६२ हेक्टर जमीन संपादीत करण्यात येणार आहे. यात ९.६० हेक्टर सरकारी, तर उर्वरित ७५२.४३ हेक्टर खासगी जमिनीचा समावेश आहे. शासनाने दोन महिन्यांपूर्वी आरापूर एमआयडीसीची अधिसूचना जारी केली. 

शेतकऱ्यांसोबत वाटाघाटी या जमिनीचे संपादन करण्यापूर्वी जमिनीचे दर ठरवा आणि मोबदला द्या, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर एमआयडीसी प्रशासनाने उद्या मंगळवारी आरापूर येथे शेतकऱ्यांची बैठक आयोजित केली होती. मात्र, आता दिवाळी सण तोंडावर आल्याने उद्याची बैठक रद्द करण्यात आली आहे. दिवाळीनंतर ही बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीला शेतकरी, लोकप्रतिनिधी आणि एमआयडीसीचे अधिकारी उपस्थित राहतील. जमिनीच्या दरासंदर्भात थेट शेतकऱ्यांसोबत वाटाघाटी करण्यात येणार आहेत. वाटाघाटीमध्ये शेतकरी काय दर मागतात आणि शासन किती दर देते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

वाळूज एमआयडीसीची स्थितीस्थापना- १९८३संपादीत जमीन - १५१३.२८ हेक्टर.भूखंड वाटप- ३६१०

English
हिंदी सारांश
Web Title : Aurangabad: Arapoor land rate for MIDC to be decided post-Diwali.

Web Summary : New industrial area near Waluj. MIDC will acquire land in Arapoor. Rate negotiations with farmers will occur after Diwali. 762 hectares acquired.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरMIDCएमआयडीसी