शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

टपाल खात्याची ऐतिहासिक सेवा “रजिस्टर्ड पोस्ट” आता इतिहासजमा ! स्पीड पोस्ट हाच पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 12:12 IST

ब्रिटिश काळात सुरू झालेल्या या सेवेने अनेक दशकं भारतीयांच्या दैनंदिन जीवनात महत्त्वाची भूमिका बजावली.

छत्रपती संभाजीनगर : भारतीय टपाल खात्याच्या इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय १ सप्टेंबरपासून औपचारिकरीत्या संपुष्टात आला आहे. “नोंदणीकृत पत्र” सर्वसामान्य नागरिकांसाठी विश्वासार्ह, औपचारिक महत्त्वाचे दस्तऐवज होते. १ सप्टेंबर २०२५ पासून अधिकृतरीत्या ही सेवा बंद करण्यात आली आहे. तर आता यानंतर या सेवेचे सर्व फायदे आता थेट स्पीड पोस्टच्या माध्यमातूनच होतील.

१५० वर्षांची परंपरा इतिहासजमाब्रिटिश काळात सुरू झालेल्या या सेवेने अनेक दशकं भारतीयांच्या दैनंदिन जीवनात महत्त्वाची भूमिका बजावली. ग्रामीण भागापासून शहरापर्यंत, कोर्टाची नोटीस, सरकारी नोकरीची ऑफर, परीक्षा निकाल, लग्नाची बोलणी किंवा दूरच्या नातलगांचा भावपूर्ण संदेश आदींचे वाहक नोंदणीकृत पत्रच असायचे. पोस्टमन जेव्हा ते पत्र हातात घेऊन दाराशी उभा राहायचा, तेव्हा घराघरात उत्सुकता आणि थोडी भीती दाटून यायची.

खर्च वाढला, स्वरूप बदललंआतापर्यंत नोंदणीकृत पत्रासाठी २२ रुपये व ४ रुपये जीएसटी म्हणजे एकूण २६ रुपये आकारले जात होते. पोहोच पावती लावली तर ३० रुपये लागायचे. तर स्पीड पोस्टची किंमत ३६ रुपये व ५ रुपये जीएसटी म्हणजे ४१ रुपये असून, पोहोच पावतीसह ती ५१ रुपयांपर्यंत पोहोचते. आता टपाल खात्याने हे सर्व पर्याय स्पीड पोस्टमध्येच एकत्रित करण्याचा निर्णय घेतला आहे.

‘संवेदना’ हरवली?टपाल खात्याच्या मते, हा बदल ग्राहकांसाठी सोयीचा आहे. कारण सर्व सुविधा ट्रॅकिंग, पोहोच पावती, कायदेशीर वैधता आदी एकाच सेवेच्या माध्यमातून मिळणार आहेत. मात्र, ज्यांनी नोंदणीकृत पत्राच्या माध्यमातून पत्र व्यवहार केले आहेत त्यांच्यासाठी हा बदल म्हणजे एक भावनिक धक्का आहे. नोंदणीकृत पत्र हे केवळ दस्तऐवज नव्हते, तर एक महत्त्वाची घटना होती. पोस्टमन ते हातात देताना ज्या गंभीरतेने पाहायचा, ती नजर आता हरवणार आहे. ‘स्पीड’ मिळेल, मात्र ती स्मृती कायम राहील, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

स्मृतींचा ठेवाजुन्या मराठी सिनेमांपासून वास्तव जीवनातील असंख्य आठवणीपर्यंत, नोंदणीकृत पत्राने कित्येक कथानकांची सुरुवात करवली. “रजिस्टर्ड पोस्ट” हा शब्दच कायदेशीर सामर्थ्य असलेला आणि औपचारिकतेचे प्रतीक ठरला होता.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरPost Officeपोस्ट ऑफिस