शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

गोड बोलून डाव टाकला; मराठा अन् ओबीसी वाद सरकारने लावल्याचा मनोज जरांगेंचा आरोप 

By बापू सोळुंके | Updated: June 20, 2024 13:08 IST

विधानसभेला २८८ उमेदवार उभे करू, नाहीतर आरक्षणविरोधी उमेदवारांना पाडू; मनोज जरांगेंचा इशारा

छत्रपती संभाजीनगर: मराठ्यांना आरक्षण देणारे तेच आणि उडविणारेही तेच आहेत. सरकारनेच १३ टक्के आणि १६ टक्के आरक्षण दिले होते. ते आता टिकले नाही. आता १० टक्के दिलं त्या अगोदर कोर्टात याचिका दाखल केल्या गेल्या. मराठा समाजावर गोड बोलून डाव टाकला असल्याचे दिसते. दरम्यान, मराठा आणि ओबीसी वाद सरकारने लावल्याचा आरोप मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला.

पाच दिवसांच्या उपोषणामुळे प्रकृती खलावल्यानंतर जरांगे पाटील हे छत्रपती संभाजीनगरमधील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. बुधवारी सकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राज्यात ओबीसी नेते पुन्हा एकवटत आहेत, याकडे कसे पाहता या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले की,  कुणाचं काय नियोजन सुरू आहे .मला माहित नाही. पण कोण काय करते हे आमच्या लक्षात आलं आहे. 

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी वेगळा प्रवर्ग द्यावा असे म्हटलं आहे याकडे तुम्ही कसे पाहता, त्यांनी काय म्हणावं हा त्यांचा भाग, देश स्वतंत्र होण्याआधीपासून मराठा समाजाला आरक्षण आहे. तसेच हे कायदेशीर आहे तरीही आम्हाला आरक्षण मागावं लागते. आमच्या जे हक्काचे आहे, ते आम्हाला मिळावे अशी आमची मागणी आहे.  मराठा आणि कुणबी एकच असताना आरक्षण मिळत नाही, अशी खंत जरांगे यांनी व्यक्त केली.

२८८ उमेदवार उभे करू...मराठा समाजाला ओबीसीतूच आरक्षण पाहिजे. राज्यसरकारला १३ जुलैपर्यंतची मुदत दिली आहे. या कालावधीत आरक्षण न दिल्यास विधानसभा निवडणूकीत २८८ उमेदवार उभे करू नाहीतर आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडू,  असा सज्जड  इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.

आमचे विरोधक भूजबळ आहेलक्ष्मण हाके हे वडिगोद्री येथे मराठा आरक्षणाविरोधात उपोषण करीत आहेत. यावर बोलताना जरांगे म्हणाले, मराठा समाजाचे विरोधक हाके नाही तर मंत्री छगन भुजबळ आहे. मी एकाही धनगर नेत्यांना बोललो नाही. त्यांना विरोधक मानलं नाही.  मफलर आडवी टाकून तो तिकडे बसतो आणि वाद लावून देतो, अशा शब्दात त्यांनी भूजबळावंर टिका केली.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणMaharashtraमहाराष्ट्रAurangabadऔरंगाबादPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर