शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

मोठ्या आशेने रोपे आणली, मिरचीचे उत्पादनच झाले नाही; शेतकऱ्यांना फसवणाऱ्या कंपनीवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 18:15 IST

झाडांना मिर्चीच लागली नाही; बोगस रोप तयार करणाऱ्या कंपनी मालक, नर्सरी चालकावर गुन्हा

- श्यामकुमार पुरेसिल्लोड: ग्रीन प्लॉटो सिड्स कंपनीच्या सी- वन वाणाच्या झाडांना मिर्चीचे उत्पादनच झाले नसल्याने शेतकऱ्यांची मोठी फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी कंपनीचे मालक, चालक, नर्सरी चालक विक्रेते अशा सात लोकांविरुद्ध सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी १० एप्रिल, गुरुवारी दुपारी २ वाजता गुन्हे दाखल केले आहेत.

बुलढाणा येथील ग्रीन प्लॉटो सिड्स कंपनीचे संचालक श्रीकृष्ण नारायण शिंदे रा.पाडलीशिंदे ता.देऊळगावराजा ,कंपनीचे प्रतिनिधी गणेश परदेशी रा.पाचोरा जि. जळगाव,बियाणे विक्रेते शिवनी ऍग्रो एजन्सी सिल्लोडचे चालक गोपाळ जंजाळ, सिल्लोड तालुक्यातील भायगाव येथील मे आदेश ग्रीनव्हेली रोपवाटीकेचे मालक सतीश दौलत भागवत ,धावडा येथील ओमसाई हायटेक रोपवाटीकेचे मालक हरिदास काशिनाथ दिवटे,  सिल्लोड तालुक्यातील निल्लोड येथील श्री साई ऍग्रो नर्सरीचे मालक नामदेव नबाजी जाधव, सिल्लोड तालुक्यातील सारोळा येथील जानवी हायटेक रोपवाटीकेचे सोमनाथ लक्ष्मण पुरी यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

बुलढाणा येथील ग्रीन प्लॉटो सिड्स कंपनीचे संचालक श्रीकृष्ण नारायण शिंदे यांनी सी-वन  नावाच्या मिर्चीचे बियाणे वाण बनावट तयार करून विक्री केले. कंपनीचे प्रतिनिधी गणेश परदेशी यांनी या वाणाची जाहिरात केली.बियाणे विक्रेते शिवनी ऍग्रो एजन्सी सिल्लोडचे चालक गोपाळ जंजाळ, सिल्लोड तालुक्यातील भायगाव येथील मे आदेश ग्रीनव्हेली रोपवाटीकेचे मालक सतीश दौलत भागवत यांनी सदर बनावट रोपांची विक्री केली. आरोपी हरिदास काशिनाथ दिवटे, नामदेव नबाजी जाधव,  सोमनाथ लक्ष्मण पुरी यांनी नर्सरीसाठी कृषी विभागाचा परवाना नसतांना मिरची बियाणे वाण सी वन बनावट वाणाची रोपे तयार करून २७ फेब्रुवारी २०२४ ते ३० जुलै २०२४ पर्यंत अनेक शेतकऱ्यांना विक्री करून त्यांची फसवणूक केली, अशी तक्रार बियाणे निरीक्षक संतोष भालेराव यांनी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली त्यावरून पोलिसांनी वरील सात आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल केले.

झाडांना मिर्चीच लागली नाहीमिर्चीच्या झाडांना कळ्या, फुल, मिरची काहीच लागली नाही. नंतर सर्व मिरची पिके उध्वस्त झाल्याची तक्रार जुलै - ऑगस्ट  २०२४ मध्ये शेतकरी विलास अण्णा मुळे ( रा केळगाव ता सिल्लोड) , सुरेश नाना मुळे ( रा केळगाव) , योगेश अशोक आहेर ( रा निल्लोड) , शंकर किसन मांडवे ( रा रेलगाव) , योगेश दादाराव फरकाडे ( रा.पिंपळदरी) यांनी सिल्लोड तालुका कृषी अधिकाऱ्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर तत्कालीन प.स.कृषी अधिकारी संजय व्यास, उपविभागीय कृषी अधिकारी सुभाष आघाव, तालुका कृषी अधिकारी न्यानेश्वर बरदे, कृषी विभागाचे शास्त्रज्ञ डॉ.रवींद्र नैनवाड, डॉ. आशिष बागडे, मंडळ कृषी अधिकारी एस. जी. तोटरे, प्रमोद डापके यांनी शेताची आणि नर्सरीमधून विक्री झालेल्या मिरची रोपांची पाहणी करून पंचनामे केला. काही नमुने प्रयोग शाळेत तपासणीस पाठवले होते. त्याबियाणे दोषी आढळले. ९ एप्रिल रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी बियाणे निरिक्षक संतोष भालेराव यांनावरील लोकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले त्यावरून हे गुन्हे दाखल करण्यात आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरFarmerशेतकरी