शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणावरून विरोधी पक्ष मराठा समाजाची दिशाभूल करत आहे, रावसाहेब दानवेंचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2024 16:20 IST

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुती १८० जागा जिंकणार, असा दावा देखील रावसाहेब दानवे यांनी केला

फुलंब्री ( छत्रपती संभाजीनगर) : मराठा आरक्षण विषयी मनोज जरांगे पाटील यांच्या मागणी संदर्भात विरोधी पक्षांनी आपली भूमिका स्पष्ठ करावी. त्यांनी समाजाची दिशाभूल करू नये, अशी टीका माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी आज केली. तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुती १८० जागा जिंकणार असा दावा देखील दानवे यांनी केला. ते फुलंब्री येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.      फुलंब्री येथे शनिवारी सभापती अनुराधा चव्हाण यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी रावसाहेब दानवे आले होते. त्यापूर्वी त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. विरोधी पक्षातील नेते मराठा समाजाची दिशाभूल करीत असल्याचा आरोप करीत दानवे यांनी केला. तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला आपला पाठींबा आहे का हे विरोधी पक्षांनी मिडिया समोर येऊन सांगावे. शरद पवार,उद्धव ठाकरे ,नाना पाटोळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. आम्ही आरक्षण देण्यासाठी तयार आहोत, पण हे आरक्षण दुसऱ्यावर अन्याय करून द्यावे अशी आमची भूमिका नाही, असे दानवे यांनी स्पष्ट केले.

देवेंद्र फडणवीस हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार अशी चर्चा आहे, असा प्रश्न विचारला असता पक्ष काहीही करू शकते असे उत्तर दानवे यांनी दिले. तर मराठा चेहरा म्हणून तुम्हाला मुख्यमंत्री पदाची जबाबदारी पक्ष देऊ शकतो का ? असी विचारणा केली असता त्यांनी मुख्यमंत्रीपद रिकामे नाही, असे सांगून दानवे यांनी अधिक बोलणे टाळले. दरम्यान, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुती १८० जागा जिंकणार असा विश्वास रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला. तसेच पक्षाने जर सरपंच पदाची निवडणूक लढविण्याचे आदेश दिले तर ती निवडणूक लढवेन. पक्षाचा आदेश अंतिम राहील. असेही दानवे यांनी सांगितले. मात्र, मी विधानसभा निवडणूक लढणार नाही, हे मी या अगोदर स्पष्ट केले आहे, अशी भूमिकाही दानवे यांनी स्पष्ट केली. 

यावेळी जिल्हाध्यक्ष सुहास सिरसाट, सभापती अनुराधा चव्हाण, विजय औताडे, शिवाजीराव पाथ्रीकर, मंगलबाई वाहेगावकर, ऐश्वर्या गाडेकर, योगेश मिसाळ, जितेंद्र जैस्वाल यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थिती होते.

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेBJPभाजपाAurangabadऔरंगाबाद