शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
2
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
3
भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... 
4
Breaking: भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; मुक्त व्यापार करार, थेट विमानसेवा अन् बरंच काही...
5
मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
6
IND vs SA: शुबमन गिलच्या दुखापतीबद्दल बॅटिंग कोचने दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
7
२०० महिलांनी कोर्टातच घेतला जीव; मालेगावात जे घडता घडता राहिलं ते नागपूरमध्ये झालं होतं
8
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांचा राजीनामा
9
Viral : जगातला सगळ्यात आळशी व्यक्ती! स्पर्धा जिंकण्यासाठी तब्बल 'इतके' तास गादीवर झोपून राहिला
10
'अनगरच्या पाटलांचा माज आम्ही उतरवणार, चुकीला माफी नाही'; अजित पवारांच्या नेत्याचा थेट इशारा
11
बंगालमध्ये 'घमासान'! "परिस्थिती अत्यंत बिघडलीये, SIR त्वरित थांबवा..."; ममता बॅनर्जींच CECना पत्र, आणखी काय म्हणाल्या?
12
IND vs SA: हार्दिक पांड्या आफ्रिकेविरूद्धच्या वनडे मालिकेत खेळणार की नाही? वाचा ताजी अपडेट
13
लाकडाचेच ते...! चीनमधील १,५०० वर्षे जुन्या प्राचीन मंदिराचे पॅव्हेलिअन पेटले; पर्यटकांनी मेणबत्ती लावली अन्...
14
भारतात विकली जाणारी टेस्ला मॉडेल Y किती सुरक्षित; युरो एनकॅप क्रॅश टेस्टमध्ये मिळवले 'एवढे' स्टार रेटिंग!
15
पश्चिम बंगालमध्ये ९०० मतदारांची नावे यादीतून गायब; निवडणूक आयोगाचा संताप, बीएलओंवर कारवाईचे आदेश
16
लोकांचे पैसे गुंतविता गुंतविता Groww ने १९,००० कोटींचे नुकसान केले; गुंतवणूकदार डोके धरून बसले...
17
पती नव्हे राक्षस! पत्नीने मित्रांना विरोध केला म्हणून मारहाण, गर्भपात आणि नंतर अश्लील व्हिडीओ व्हायरल
18
'पाश्चिमात्य दबावातही भारत-रशिया संबंध मजबूत', अमेरिकेचा उल्लेख करत रशियाची मोठी प्रतिक्रिया
19
Nashik: येवल्यात छगन भुजबळांच्या 'पंच'मुळे उद्धवसेना 'सलाइन'वर, 'शिंदेसेने'लाही दिला शह
20
एकनाथ शिंदेंच्या तक्रारीनंतर अमित शाहांकडून रवींद्र चव्हाणांची पाठराखण; "पक्षबांधणी सुरूच ठेवा..."
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅव्हल्सच्या डिक्कीचा उघडा दरवाजा धावत्या रिक्षात घुसला, दोन मैत्रिणींचा गळा कापल्याने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 18:57 IST

पत्रा अडकल्याचे कळूनही बेजबाबदार चालक थांबला नाही, रिक्षाला फरफटत नेत पलटेपर्यंत बस चालवत राहिला

छत्रपती संभाजीनगर : मध्यप्रदेशमधील सिहाेरच्या कुबेरेश्वर धाम येथे दर्शन करुन शहरात परतलेल्या दहा प्रवाशांच्या रिक्षाचा भीषण अपघात झाला. समोरून येणाऱ्या ट्रॅव्हल्सचा लगेज कंपार्टमेंटचा (डिक्की) दरवाजा उघडा राहिला. दरवाजा थेट रिक्षात घुसला. यात मागे बसलेल्या चौघींपैकी लता राजू परदेशी (४७), आशा राजू चव्हाण (४०, दोघी रा. वाळूज) या दोन मैत्रिणींचा जागीच मृत्यू झाला. दोघी गंभीर जखमी झाल्या. चालकासह त्याच्या मागील सीटवर बसलेल्या तिघींच्या वरून डिक्कीचा दरवाजा गेल्याने ते बालंबाल वाचले. बुधवारी पहाटे ४ वाजता पंचवटी चौक ते लोखंडी पूल रस्त्यावर ही घटना घडली.

मध्यप्रदेशात सिहोर येथे कुबेरेश्वर धाम असून, पंडित प्रदीप मिश्रा त्याचे प्रमुख आहेत. देशभरातून तेथे हजारो भाविक रोज दर्शनासाठी जातात. वाळूज परिसरातील आशा, लता यांच्यासह त्यांच्या मैत्रिणीही धार्मिक होत्या. दोन महिन्यांपासून त्यांनी सिहोर येथे जाण्याचे ठरवले होते. लता, आशा यांच्यासह मंगल अरुण व्हाणे, भारती भगवान एकनुरे, सीमा शिवाजी काकडे, अनिता सुधाकर मोतकर, शांता सीताराम बलैया, शोभा सुभाष वाघ व अन्य दोघे असे एकूण दहा जण १७ नोव्हेंबर रोजी रेल्वेने सिहाेर येथे दर्शनासाठी गेले होते. त्यांच्यातील दोघे तेथेच मुक्कामी थांबले. तर आठ जण भोपाळ, मनमाड मार्गे रेल्वेने पहाटे ३ वाजता शहरात परतले. त्यांच्यापैकी शामा श्रीरामपूरला जाण्यासाठी रेल्वे स्टेशनवरच थांबल्या. तर सात मैत्रिणींनी रिक्षा करुन वाळूजला जाण्याचे ठरवले.

अर्धा तास महिला मृतावस्थेत पडून-लता, आशा, भारती व मंगल या रिक्षाच्या मागील सीटवर बसल्या. तर उर्वरित तिघी मधल्या सीटवर बसल्या. आरटीओ कार्यालयासमोरून रिक्षाने पंचवटी चौकातून लोखंडी पुलाच्या दिशेने वळण घेतले.-त्याच वेळी पर्पल कंपनीची ट्रॅव्हल्स (एमपी ०९ एके ८०१६) सुसाट समोरून येत होती. बसच्या उजव्या बाजूच्या डिक्कीचा दरवाजा क्लीनरने उघडा ठेवल्याने जवळपास तीन फुट तो बाहेर आला होता.-पहाटे अंधार असल्याने चालकाला ही बाब दिसलीच नाही. लक्षात येईपर्यंत बस वेगात येत डिक्कीचा दरवाजा थेट रिक्षात घुसला. मागे बसलेल्या लता, आशा यांच्यापर्यंत तो जात त्यांना गंभीर जखमी केले.-डिक्कीचा दरवाजा रिक्षात घुसल्याचे चालकाच्या लक्षात आले. मात्र, तरीही त्याने बस पुढे नेल्याने रिक्षा फरफटत जात पलटी झाली. या भीषण अपघातात लता, आशा यांचा जागीच मृत्यू झाला. तर भारती व मंगल या जखमी झाल्या. सीमा, अनिता व शांता बचावल्याने सुखरूप घरी परतल्या.

अपघाताचा मोठा आवाज, चालक, क्लीनर ताब्यातरिक्षाचालकाने स्वत:ला सावरत इतरांना मदत मागितली. अपघाताचा मोठा आवाज झाल्याने आसपासचे स्थानिक, अन्य वाहनचालकांनी धाव घेतली. त्यांनी ११२ वर घटना कळवली. त्यानंतर छावणी पोलिसांनी धाव घेतली. जखमी महिलांना त्यांच्या नातेवाइकांनी खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पळून जाणारे बसचालक चेन्नवरी श्रीकांत गुवे (२९, रा. बिदर, कर्नाटक) व क्लीनर राज सुनील बैरागी (२०, रा. मध्यप्रदेश) यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दोघांवरही लता यांचे भाऊ बाळू दुसारे यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात असून, गुवे, बैरागीला अटक करण्यात आल्याचे छावणी पोलिस ठाण्याचे प्रभारी डॉ. विवेक जाधव यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Open truck door kills two women in autorickshaw accident.

Web Summary : Two women died, two injured near Chhatrapati Sambhajinagar after a truck's open compartment door struck their autorickshaw. The victims were returning from a pilgrimage. Police arrested the truck driver and cleaner.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAccidentअपघात