छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात जि. प. गट व पं. स.ची प्रभाग रचना झाली. त्यावर आक्षेप नोंदविण्याची मुदतही सोमवारी संपली. विभागात जि. प.चे सहा गट तर पं. स.चे १२ गण वाढले आहेत. त्यानुसार प्रभाग रचना करण्यात आली आहे.
२०२० पासून आजवर विभागातील ८ जि. प.च्या व ७६ पं. स. निवडणुकांचा कार्यकाळ टप्प्याटप्प्याने संपला. त्यावर प्रशासक होते. मे महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक घेण्याचा मार्ग मोकळा केल्यानंतर निवडणूक आयोग सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीत आहे. २०११ च्या जनगणनेनुसार विभागाची लोकसंख्या १ कोटी ८७ लाख ३७ हजार ७३२ आहे. त्याआधारे प्रारूप गट व गण रचना केलेली आहे. विधानसभा निवडणुकीत मराठवाड्यात १ कोटी ५६ लाख ३६ हजार ४६४ मतदार होते. २०११ची लोकसंख्या आणि डिसेंबर २०२४ पर्यंतची मतदारसंख्या यात ३१ लाख १ हजार २६८ इतका फरक आहे.
छत्रपती संभाजीनगरजि. प. गट : ६३पंचायत समिती गण : १२६वाढ : गट-१, गण-२
परभणीजि. प. गट : ५४पं. स. गण : १०८वाढ : नाही
जालनाजि. प. गट : ५७पं. स. गण : ११४वाढ : गट-१, गण-२
हिंगोलीजि. प. गट : ५२पं. स. गण : १०४वाढ : नाही
नांदेडजि. प. गट : ६५पं. स. गण : १३०वाढ : गट-२, गण-४
बीडजि. प. गट : ६१पं. स. गण : १२२वाढ : गट-१, गण-२
लातूरजि. प. गट : ५९पं. स. गण : ११८वाढ : गट-१, गण-२
धाराशिवजि. प. गट : ५५पं. स. गण : ११०वाढ : नाही
मराठवाड्यात १ कोटी ५६ लाख मतदारविधानसभा निवडणुकीत मराठवाड्यात १ कोटी ५६ लाख ३६ हजार ४६४ मतदार होते. विभागात २ लाख ४२ हजार ३५२ मतदार वाढले होते. आगामी जि. प., पं. स. निवडणुकीपर्यंत हा आकडा बदललेला असेल. १६,८२६ मतदान केंद्र विधानसभा निवडणुकीत होते.
मतदार संख्येत राजधानी आघाडीवरछत्रपती संभाजीनगर : ३१ लाख ७६ हजार ८३०जालना : १६ लाख २३ हजार ९४३परभणी : १५ लाख ३२ हजार ३०७हिंगोली : ९ लाख ७४ हजार ५४१नांदेड : २७ लाख ५१ हजार ६३८लातूर : २० लाख १६ हजार ९९०धाराशिव : १३ लाख ९४ हजार १२बीड : २१ लाख ९७ हजार ८३०(डिसेंबर २०२४ पर्यंत)