शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका आता थांबणार नाही; जालना रोडनंतर सर्व मुख्य रस्ते ६० मीटर रुंद होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 19:48 IST

६० मीटर रस्ता रुंद केल्यावर दोन्ही बाजूंनी पथदिवे बसविले जातील. रस्त्याची रुंदी लिहिली जाणार असून, जेणेकरून कोणी अतिक्रमण करणार नाही.

छत्रपती संभाजीनगर : शहरातील चार मुख्य रस्ते महापालिका कोणत्याही परिस्थितीत मोकळे करणारच आहे. जालना रोड म्हणजे महावीर चौक ते केम्ब्रिज या पहिल्या टप्प्यात रुंदीकरणाचे काम सुरू आहे. महानुभाव आश्रम ते नक्षत्रवाडी, वसंतराव नाईक चौक ते हर्सूल गाव, महावीर चौक ते दौलताबाद टी पॉइंटपर्यंतचे रस्ते ६० मीटर रुंद केले जातील. रस्त्यात बाधित होणाऱ्यांनी स्वत:हून आपल्या मालमत्ता काढून घ्याव्यात. महापालिकेवर कारवाईची वेळ आणू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

शहरात नवीन नवीन कंपन्या येत आहेत. लवकरच मुबलक प्रमाणात पाणीही मिळणार आहे. त्यामुळे शहराची लोकसंख्या बरीच वाढेल. भविष्याच्या दृष्टीने रस्ते रुंद होणे खूपच आवश्यक आहे. मुकुंदवाडीत खून झाल्यानंतर कारवाई सुरू केली. मालमत्ताधारक न्यायालयात गेले. आता न्यायालयाच्या आदेशानुसारच पुढील कारवाई होईल. पावसाळ्यात कारवाई करता येत नाही, असा आरोप राजकीय मंडळींकडून होतोय, यावर जी. श्रीकांत म्हणाले, रस्त्यात एखादे घर असेल तर ते काढता येते. बहुतांश मालमत्ता या व्यावसायिकच आहेत. जालना रोडसह अन्य ठिकाणी नागरिक स्वत:हून मालमत्ता काढून घेत आहेत. त्यांनी काढले नाही तर मनपा काढणारच आहे.

६० मीटरवर पथदिवे६० मीटर रस्ता रुंद केल्यावर दोन्ही बाजूंनी पथदिवे बसविले जातील. रस्त्याची रुंदी लिहिली जाणार असून, जेणेकरून कोणी अतिक्रमण करणार नाही. बीड बायपासवर सिमेंटचे पोल बसविण्यात येत आहेत. लवकरच महापालिका सर्व्हिस रोड करणार आहे. गुंठेवारीचे २० कोटी मनपाकडे आहेत, रस्त्यांसाठी ही रक्कम खर्च होईल.

रस्त्यांवर मार्किंग होईल.शहरातील रस्ते रुंद करण्यासाठी वेगवेगळ्या रस्त्यांवर एकूण ५० अभियंते नियुक्त आहेत. मालमत्ताधारकांना नोटिसा देण्यास त्यांना सांगितले आहे. भूमी अभिलेख विभागालाही काही ठिकाणी सोबत घेऊन रस्त्यांवर मार्किंग होईल.

७ दिवसांत टीडीआर मिळेल६० मीटरच्या आत एखाद्याच्या मालकीची जमीन खुली असेल तर त्याला ७ दिवसांत टीडीआर मिळेल. बांधकाम केले असेल, त्यांना टीडीआर मिळणार नाही, त्यांनी उर्वरित जागेची गुंठेवारी करून घ्यावी. महापालिकेची मुकुंदवाडी स्मशानभूमीसुद्धा मागे घेत आहोत. पुतळा गार्डनमध्ये शिफ्ट केला जाईल. धार्मिक स्थळ काढले जाईल.

चंपा चौक ते जालना रोडचंपाचौक ते जालना रोड हा रस्ताही तयार केला जाईल. लोकप्रतिनिधींची मागणी आहे. देवळाई चौक ते झाल्टा फाट्यापर्यंत रुंदीकरण मोहीम राबविली जाणार आहे.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका