शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

किमतीचा काय हा घोळ! औषधी एकच; पण किमती वेगवेगळ्या; खरी किमत कोणती?

By संतोष हिरेमठ | Updated: May 30, 2024 19:04 IST

औषधींच्या किमतीचा काय हा घोळ; कुठे ‘एमआरपी’वरच, तर कुठे ‘एमआरपी’पेक्षा कमी दरात विक्री

छत्रपती संभाजीनगर : एकच ब्रँडेड औषधी; पण त्यासाठी औषधी दुकानांवर वेगवेगळी किंमत मोजावी लागत आहे. कुठे ‘एमआरपी’वरच, तर कुठे ‘एमआरपी’पेक्षा कमी दरात विक्री होत आहे. अशा परिस्थितीत औषधींवर मनमानी पद्धतीने किमत छापून ग्राहकांचा खिसा रिकामा केला जात आहे; मात्र त्यावर सरकारचे नियंत्रण नसल्याचा ओरड होत आहे.

ब्रँडेड औषधीच्या १० गोळ्यांच्या स्ट्रिपची शहरातील वेगवेगळ्या भागांतील औषधी दुकानांतून खरेदी करण्यात आली. तेव्हा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी रक्कम आकारण्यात आली. औषधी घेतल्यानंतर ती ‘एमआरपी’पेक्षा कमी दरात मिळाल्याने पैशांची बचत झाल्याची भावना नातेवाइकांत निर्माण होते; परंतु तीच औषधी अन्य औषधी दुकानातून घेतली जातात, तेव्हा आणखी स्वस्तात मिळत असल्याचा अनुभव नागरिकांना येत आहे. ‘एमआरपी’पेक्षा स्वस्तात मिळणे चांगली गोष्ट आहे; पण ‘एमआरपी’च जास्त लिहिली जात आहे का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

जिल्ह्यातील औषधी दुकाने -३,५००

१) समर्थनगर येथे १०१ रुपयेसमर्थनगर येथील एका औषधी दुकानावर एका कंपनीच्या १० गोळ्यांच्या स्ट्रिपची मागणी करण्यात आली. त्यावर १०१.५० रुपये एमआरपी होती. औषधी विक्रेत्याने १०१ रुपये आकारले.

२) जवाहर काॅलनीत ९५ रुपयेजवाहर काॅलनीतील एका औषधी विक्रेत्याने याच गोळ्यांच्या स्ट्रिपसाठी कॅल्क्युलेटरवर हिशेब केला आणि ९५ रुपये लागतील, असे सांगितले.

३) ज्युबिली पार्कला ९० रुपयेज्युबिली पार्क येथील औषधी विक्रेत्याने आधी ‘एमआरपी’चा दर सांगितला. त्यानंतर विक्रेत्याने या १० गोळ्यांच्या स्ट्रिपसाठी ९० रुपये आकारले.

१० रुपयांची औषधी १५० रुपयांना : पी. आर. सोमाणीदी निजामाबाद चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीचे संस्थापक अध्यक्ष पी. आर. सोमाणी हे गेल्या अनेक वर्षांपासून उत्पादकांकडून औषधांवर छापण्यात येणाऱ्या ‘असमान’ ‘एमआरपी’विरुद्ध लढा देत आहेत. ‘लोकमत’शी बोलताना सोमाणी म्हणाले, १० रुपयांची औषधी १५० रुपयांना विकली जात आहेत. ‘एमआरपी’वर सरकारचे नियंत्रणच नाही. औषधी कंपन्या मनमानी पद्धतीने ‘एमआरपी’ छापत आहेत. निवडणुकीनंतर त्यावर नियंत्रण येण्याची अपेक्षा आहे.

स्वत:चा नफा कमी करून डिस्काउंटस्पर्धा वाढलेली आहे. ग्राहक डिस्काउंट मागतात. त्यामुळे डिस्काउंट दिले जाते. विक्रेते स्वत:चा नफा कमी करून डिस्काउंट देतात. मात्र, प्रत्येक जण डिस्काउंट देतो, असेही नाही.- नितीन देशमुख, अध्यक्ष, केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशन

जीएसटी हटविण्याची गरज‘एमआरपी’पेक्षा अधिक पैसे घेतले जात नाही. ‘एमआरपी’पेक्षा कमी दरात औषधी विकणे हा स्पर्धेचा भाग आहे. मोठे औषधी दुकानदार ‘एमआरपी’वरच विक्री करतात. तर छोटे औषधी दुकानदार हे स्वत:चा नफा कमी करून ग्राहकांना डिस्काउंट देऊन विक्री करतात. औषधींवरील जीएसटी हटविल्यास ती अधिक स्वस्त होतील.- अनिल महाजन, युनिट सचिव, महाराष्ट्र सेल्स ॲण्ड मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादmedicineऔषधंhospitalहॉस्पिटल