शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल रोज चार्ज करता, तसं मतदारांना रोज भेटा; भाजप प्रदेशाध्यक्ष चव्हाणांचा कार्यकर्त्यांना मंत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 13:58 IST

छत्रपती संभाजीनगर नामकरण झाल्यानंतर महापालिकेत भगवा फडकणार, पहिला महापौर भाजपचाच!

छत्रपती संभाजीनगर: "छत्रपती संभाजीनगर शहराचे ऐतिहासिक नामकरण झाल्यानंतर होणारी ही पहिलीच महानगरपालिका निवडणूक आहे. ही निवडणूक केवळ सत्तेसाठी नाही, तर शहराच्या अस्मितेसाठी आहे. त्यामुळे या नवीन नावाच्या महापालिकेत पहिला महापौर भाजपचाच बसवायचा आहे," असा ठाम निर्धार भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आज व्यक्त केला.

शहरातील भाजपच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयात आयोजित 'बुथ प्रमुख मेळाव्यात' ते बोलत होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना '५१ टक्के' मतदानाची लढाई जिंकण्याचे उद्दिष्ट दिले.

गतिमान सरकार आणि विकासाचा पाढा आपल्या भाषणात चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कामांचे कौतुक केले. "केंद्रातून येणारा १०० टक्के निधी आता थेट लोकांच्या खात्यात जमा होतो, भ्रष्टाचार थांबला आहे," असे ते म्हणाले. शहराच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर भाष्य करताना त्यांनी आश्वासन दिले की, "येत्या एक महिन्याच्या आत शहराचा पाणी प्रश्न मार्गी लागेल, हा शब्द मतदारांपर्यंत पोहोचवा."

कार्यकर्त्यांना विशेष संदेश कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी एक रंजक उदाहरण दिले. "जसा आपण आपला मोबाईल रोज चार्ज करतो, तसंच मतदारांना रोज भेटा. जोपर्यंत त्यांना पटत नाही, तोपर्यंत वारंवार योजनांची माहिती द्या. २०१४ पूर्वीचे लोडशेडिंग आणि आजची अखंड वीज यातील फरक लोकांना समजून सांगा," असे आवाहन त्यांनी केले. "तुम्ही फक्त एकदा कमळाचे बटन दाबा, पुढची पाच वर्षे देवेंद्र फडणवीस तुम्हाला सांभाळतील," असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. या मेळाव्याला भाजपचे जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष आणि मोठ्या संख्येने बुथ प्रमुख व पदाधिकारी उपस्थित होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Meet voters daily, like charging phones: BJP chief to workers.

Web Summary : BJP aims for Sambhajinagar's mayoral win, emphasizing development. Chavan urged daily voter contact, highlighting government achievements like direct fund transfers and improved electricity, promising water issue resolution. Fadanvis will care for you for five years if you vote BJP, he claimed.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Corporation Electionछत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक २०२६Ravindra Chavanरविंद्र चव्हाणBJPभाजपा