शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

अवैध धंद्यामुळे नेहमीच पोलिसांच्या संपर्कात होते बजाजनगर दरोड्याचे सूत्रधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 14:25 IST

लॉजिंग वेश्याव्यवसायासाठी परिसरात कुख्यात, दीड हजार रुपयांत चालायचा देहव्यापार; २०१० मध्ये शहरात आलेल्या हाजबेने १५ वर्षांत बसवला अवैध व्यवसायात जम

छत्रपती संभाजीनगर : बजाजनगर दरोड्याचे मुख्य सूत्रधार अमोल खोतकर व योगेश सुभाष हाजबे या दोघांनी परिसरात राजरोस वेश्याव्यवसाय, अवैध दारूविक्री सुरू केली होती. या माध्यमातून हाजबेची एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांसोबत ‘ओळख’देखील होती. एन्काउंटर झालेल्या या लॉजसमोरील संपूर्ण मैदानावर कंडोम व दारूच्या बाटल्यांचा अक्षरश: खच साचला होता. याच अवैध धंद्यांमुळे डेअरिंग वाढून त्यांनी दरोड्यापर्यंत मजल मारली.

मूळ बुलढाणा जिल्ह्यातील असलेला हाजबे २००९ मध्ये मजूर म्हणून वाळूज औद्योगिक वसाहतीमध्ये आला होता. तेव्हापासून तो अवैध व्यावसायिकांच्या संपर्कात आला. २०१४ मध्ये त्याच्यावर बुलढाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याचा पहिला गुन्हा दाखल झाला. २०१६ मध्ये त्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. त्याचदरम्यान तो वाळूजमध्ये अवैध दारूविक्रीत उतरला. त्याने साजापूरमधील साई लॉजिंग अँड गार्डन भाडेतत्त्वावर चालवण्यास घेतले होते. औद्योगिक वसाहतीत इंडस्ट्रीच्या प्लॉटवर त्याने अवैधरीत्या लॉजिंग उघडून देहविक्री सुरू केली होती.

परराज्यातील मुलीपोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हाजबेच्या या लॉजवर अनेकदा परराज्यातील मुली देहविक्रीसाठी आणल्या जात होत्या. त्याच व्यवसायातून त्याची लाखोंची कमाई सुरू झाली. गुन्हे दाखल होत असतानाच त्याची कारागृहात अमोलसोबत ओळख झाली. देहविक्रीमुळे अमाेलचे सातत्याने त्याच्या हॉटेलवर जाणे होत होते. तेथून त्यांची मैत्री झाली.

एमआयडीसी वाळुज पोलिसांची डोळेझाकएमआयडीसी वाळुज पोलिसांकडून परिसरातील अशा अनेक अवैध धंद्यांची पाठराखण केली जाते. हाजबेच्या लॉजवर देहविक्री चालते, ही बाब एमआयडीसी वाळूज पोलिसांसह सर्वांना माहीत होती. मात्र त्यांनी डोळेझाक केली. त्याची परिणती ही अशी झाली.

टॅग्स :Robberyचोरीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारी