शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
4
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
5
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
6
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
7
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
8
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
9
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
10
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
11
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
12
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
13
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
14
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
15
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
16
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
17
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
18
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
19
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
20
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 

‘मंदिरवाला हवा की दारूवाला’; चंद्रकांत खैरेंच्या प्रचारात कार्यकर्त्यांकडून मतदारांना सवाल

By संतोष हिरेमठ | Published: April 29, 2024 12:14 PM

महाविकास आघाडीचे पदाधिकारी गावागावांतील, शहरातील विविध भागांतील कार्यकर्त्यांना फोन करतात आणि प्रचाराची स्थिती, प्रतिसाद कसा आदींची विचारणा करतात.

छत्रपती संभाजीनगर : महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारात कार्यकर्त्यांकडून ‘मंदिरवाला हवा की दारूवाला’ असा नारा दिला जात आहे. मद्य परवाना असल्यामुळे शिंदेसेनेचे उमेदवार संदीपान भुमरे यांचा प्रचार ‘दारूवाला’ आणि मंदिरांना भेट देतात म्हणून चंद्रकांत खैरे यांना ‘मंदिरवाला’ असे सांगून मतदारांमध्ये प्रचार सुरू केला आहे.

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात शिंदेसेनेचे म्हणजे महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी पक्षाच्या एबी फाॅर्मसह गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. या अर्जासोबत त्यांनी संपत्तीचे अंतिम विवरणपत्रही सादर केले. त्यात उत्पन्नाचा स्त्रोत म्हणून त्यांच्या पत्नीच्या नावे मद्यविक्री परवाने असल्याचे नमूद केले. भुमरे यांनी पूर्वीच्या उमेदवारी अर्जासोबत प्रतिज्ञापत्रात मद्य व्यवसाय लपविल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला होता. यावरून दोन्हींकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या सुरू होत्या. हा मुद्दा मागे पडेल असे दिसत असताना आता उद्धवसेनेने चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारात हाच मुद्दा उचलून धरल्याचे पाहायला मिळत आहे.

हॅलो, विचारा कोण पाहिजे?महाविकास आघाडीचे पदाधिकारी गावागावांतील, शहरातील विविध भागांतील कार्यकर्त्यांना फोन करतात आणि प्रचाराची स्थिती, प्रतिसाद कसा आदींची विचारणा करतात. एखाद्या ठिकाणी प्रतिसाद नाही, असे कार्यकर्त्यांनी सांगताच ‘नागरिकांना विचारा, त्यांना कोण पाहिजे, मंदिरवाला हवा की दारूवाला...’ असे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते.

टॅग्स :aurangabad-pcऔरंगाबादChandrakant Khaireचंद्रकांत खैरेSandipan Bhumreसंदीपान भुमरेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४