शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

थारला बांधून एटीएम मशीनच पळविण्याचा चोरट्यांचा प्रयत्न; छत्रपती संभाजीनगरची घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 16:36 IST

चोरांनी आत प्रवेश करत सर्वप्रथम सर्व सीसीटीव्ही कॅमेरे फोडले. बेल्टने मशीन ओढण्याआधी स्क्रू ड्रायव्हरने फोडण्याचा प्रयत्न केला.

छत्रपती संभाजीनगर : थार गाडीला बेल्ट बांधून त्याची दुसरी बाजू एटीएम यंत्रास बांधून लाखोंची रोख मशीनसह लंपास करण्याचा धक्कादायक प्रकार रविवारी मध्यरात्री तीन वाजता शहानूरवाडीत घडला. मात्र, मशीन ओढताना बेल्टच तुटल्याने चोरांचा प्रयत्न फसला.

एसबीआय बँकेच्या शहानूरवाडीतील शाखेलगतच एटीएम सेंटरही आहे. रविवारी मध्यरात्री तीन वाजता थार वाहनातून येत चारजणांनी एटीएम सेंटरमध्ये प्रवेश केला. बराच वेळ आत रेकी करून त्यांनी वाहनाला मागून दोन्ही बाजूंनी बेल्ट बांधले. बेल्टची दुसरी बाजू एटीएम मशीनला बांधली. एकाने गाडी सुरू करून एटीएम मशीन थेट बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र, मध्येच बेल्ट तुटला आणि चोरांच्या प्रयत्नावर पाणी फेरले गेले. या प्रकारामुळे मोठा आवाज झाल्याने चोरांनी क्षणात पोबारा केला. घटनेची माहिती कळताच जवाहरनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सचिन कुंभार, उपनिरीक्षक मारोती खिल्लारे यांनी घटनास्थळी धाव घेतली. व्यवस्थापक विशाल इंदूरकर यांच्या तक्रारीवरून अज्ञात चार चोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

आधी स्क्रू ड्रायव्हरने तोडण्याचा प्रयत्नचोरांनी आत प्रवेश करत सर्वप्रथम सर्व सीसीटीव्ही कॅमेरे फोडले. बेल्टने मशीन ओढण्याआधी स्क्रू ड्रायव्हरने फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. मशीन ओढल्यानंतर ती नेण्यासाठीदेखील काही अंतरावर वाहन उभे केल्याचा संशय पोलिसांना आहे. यापूर्वी शहरात बीड बायपास, वाळूज व पडेगाव परिसरात अशाच घटना घडल्या. मात्र, त्यातील आरोपींचा शोध घेण्यात पोलिसांना अपयश आले.

टॅग्स :atmएटीएमchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारी