शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

लग्नाचा आनंद शोकसागरात बदलला; कन्यादानानंतर बेपत्ता पित्याचा मृतदेह तलावात सापडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 15:00 IST

लग्नाच्या आनंदावर विरजण पडल्याने नवदाम्पत्य व दोन्ही कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला.

वाळूज महानगर ( औरंगाबाद ) : मुलीच्या कन्यादानानंतर बेपत्ता झालेल्या पित्याचा मृतदेह मंगळवारी साजापूरच्या पाझर तलावात सापडल्याने खळबळ उडाली. या घटनेमुळे मुलीच्या सासर व माहेरकडील मंडळींना चांगलाच धक्का बसला असून दोन्ही गावांवर शोककळा पसरली आहे. (The body of the missing father was found in the lake after Kanyadana)

समीर चाँद शाह (रा.चांदवड जि.नाशिक) हे पत्नी शाहीनबी, मुलगा साहिल व मुलगी सानिया यांच्यासह गत सहा-सात वर्षांपूर्वी रोजगाराच्या शोधात साजापुरात स्थायिक झाले होते. वाहनचालकाचे तसेच मिळेल ते काम करून त्यांनी कुटुंबाचे पालनपोषण केले. चार दिवसांपूर्वी १८ फेब्रुवारीला त्यांनी कन्या सानिया हिचा विवाह समीर शेख या तरुणासोबत थाटामाटात लावून दिला. लग्नानंतर रविवारी ढोरकीन येथे वलीमा (रिसिप्शन)चा कार्यक्रम असल्याने समीर शाह कुटुंब व नातेवाईकांसोबत ढोरकीनला गेले. नंतर सर्व कुटुंबीय साजापूरला परतले.

कन्यादानानंतर बेपत्ता पित्याचा मृतदेह तलावात सापडलाकार्यक्रमानंतर थकलेले कुटुंबीय व नातेवाईक घरात झोपी गेले. सोमवारी सकाळी समीर शाह हे घरात न दिसल्याने कुटुंबीय व नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला. त्यांचा मोबाइलही बंद होता. मंगळवारी सकाळी साजापूरच्या पाझर तलावात एका इसमाचा मृतदेह तरंगत असल्याचे दिसून आल्यानंतर एमआयडीसी वाळूज पोलिसांनी मनपा अग्निशमन विभागाला पाचारण करून मृतदेह बाहेर काढला. मयताजवळील कागदपत्रांवरून अनोळखी इसमाची ओळख पटली. तो मृतदेह समीर शहा यांचा होता.

लग्नाच्या आनंदावर विरजणया घटनेने साजापूरवर शोककळा पसरली. लग्नाच्या आनंदावर विरजण पडल्याने नवदाम्पत्य व दोन्ही कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला. समीर शहा यांनी आर्थिक विवंचनेत टोकाचे पाऊल उचलले की, मृत्यूचे कारण वेगळे आहे, याचे गूढ आहे. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज ठाण्यात नोंद करण्यात आली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDeathमृत्यू