शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

अमानुषतेचा कळस! पोलिसांनी संशयावरून तरुणाला भररस्त्यावर लाठी तुटेपर्यंत झोडपलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 12:08 IST

अंगावरील वळ पाहून काळजाचं पाणी होईल; मुकुंदवाडीतील 'त्या' दोन पोलिसांवर गुन्हा दाखल अन् निलंबन

छत्रपती संभाजीनगर : दुचाकी चोरीची असल्याचा आळ घेत दोन पोलिस अंमलदारांनी तरुणाला लाठी, लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तरुणाच्या संपूर्ण शरीरावर वळ उमेटपर्यंत मारहाण करण्यात आली. या घटनेची पोलिस आयुक्त प्रविण पवार यांनी गंभीर दखल घेतली. त्यानंतर मुकुंदवाडी पोलिस ठाण्याचे अंमलदार गणेश वाघ व संतोष बिरारे या दोघांवरही जखमी तरुणाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करत तडकाफडकी निलंबित करण्यात आले.

अक्षय ज्ञानेश्वर ठोकळ (३२, रा. मुकुंदवाडी) असे जखमीचे नाव आहे. २१ जानेवारी रोजी मध्यरात्री १२:३० वाजता अक्षय त्याचा मित्र भाऊसाहेब मोरे याच्यासह मुकुंदवाडीच्या बसथांबा परिसरात सिगारेट ओढण्यासाठी गेले होते तेव्हा तेथे अंमलदार वाघ व बिरारे उपस्थित होते. त्यांनी अक्षयला कशासाठी आलात, अशी विचारणा केली. भाऊसाहेबने त्यांना सिगारेटचे कारण सांगितले. मात्र, त्यांनी अचानक त्यांच्याकडील दुचाकीबाबत विचारणा केली. ती चोरीची असल्याचा संशय व्यक्त केला. अक्षयने ती दुचाकी बुलढाण्याचा मित्र शुभम जाधवची असल्याचे सांगितले शिवाय, त्याची कागदपत्रेही असल्याचे स्पष्ट केले. मात्र, त्यातून त्यांच्यात वाद झाला. अक्षयच्या आरोपानुसार, त्याचे काहीही ऐकून न घेता बिरारे व वाघने त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मांडी, पाठ, मानेवर लाठी तुटेपर्यंत वार केले.

जखमी अवस्थेतही केली मारहाणपोलिसांच्या मारहाणीत अक्षय जखमी होऊन जमिनीवर कोसळला तरीही दोन्ही अंमलदार त्याला पोट, छातीत लाथांनी मारून शिवीगाळ करत होते. भाऊसाहेबने त्यांना थांबण्याची विनंती केली. मात्र, पोलिसांनी त्यालाही मारहाण केली. त्यामुळे घाबरून भाऊसाहेबने घरी जाऊन अक्षयच्या भावाला घेऊन आला.

सीसीटीव्ही फुटेजमुळे प्रकरण उघडकीसमुकुंदवाडी पोलिसांकडून दोन दिवस हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला. शुक्रवारी मात्र या मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले. पोलिसांच्या या वागणुकीबाबत सर्व स्तरांतून टीका झाली. अक्षयच्या तक्रारीवरुन मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात अंमलदार संतोष बिरारे व गणेश वाघ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिस आयुक्तांची ठाण्यात धावघटनेची गंभीर दखल घेत पोलिस आयुक्त प्रवीण पवार, पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी, सहायक पोलिस आयुक्त मनिष कल्याणकर यांनी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात भेट दिली. त्यानंतर जखमी अक्षय व त्याच्या कुटुंबासोबत चर्चा करून कठोर कारवाईचे आश्वासन दिले.

येथे दादागिरी, तिकडे गुन्हेगार सुसाटमुकुंदवाडीत सातत्याने कुख्यात गुन्हेगारांचा हैदास सुरू आहे. एकीकडे राजनगर, मुकुंदवाडी रेल्वेस्थानक परिसर, शिवाजीनगर ते रामनगर असा नव्याने झालेल्या रस्त्यावर गुन्हेगारांचा मोठा वावर असतो. नशा, लूटमार चालते. मात्र, रात्री मुकुंदवाडी ठाण्यातील एकही अधिकारी, कर्मचारी गस्त घालत नाही. अन्यत्र मात्र सामान्यांवर दंडेलशाही करत असल्याने स्थानिकांनी रोष व्यक्त केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Police brutality: Cops thrash youth mercilessly over suspicion of theft.

Web Summary : Two cops in Chhatrapati Sambhajinagar brutally assaulted a youth suspected of bike theft, leaving him severely injured. Following public outrage and CCTV footage surfacing, the officers were suspended and charged after police commissioner intervened.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर