शहरं
Join us  
Trending Stories
1
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
2
सीमेवर ‘ऑपरेशन त्रिशूल’ची तयारी; पाकिस्तानी सैन्यात खळबळ, लष्करी सरावामुळे झोप उडाली
3
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
4
Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक
5
नोकरीनंतर फिक्स उत्पन्न हवे? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देईल दरमहा ९००० रुपये; कोण करू शकतो गुंतवणूक?
6
बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी
7
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?
8
'स्वत:चे घर घेणे' सर्वात वाईट निर्णय? 'भाड्याने राहा आणि कोट्यधीश व्हा'; बँकरने सांगितला फॉर्म्युला
9
किडनी फेल झाल्याने सतीश शाह यांचं निधन; 'या' गोष्टी कारणीभूत, 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
10
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
11
लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
भुरटा नाही, अट्टल गुन्हेगार; ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छेड काढणाऱ्या अकील खानची क्राइम कुंडली समोर
13
Video: शत्रुंजय टेकडीवर जंगलाच्या 'राजा'चा मुक्त वावर; सिंह दिसताच पर्यटक घाबरुन पळाले...
14
निवृत्तीनंतरही कर्ज मिळवणं सोपं! 'या' ३ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, बँक लगेच देईल लोन
15
पंकजा मुंडेंनी घेतली मयत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबीयांची भेट; मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी...
16
अखेर तारीख जाहीर! 'या' दिवशी येणार Lenskart चा IPO; ₹7278 कोटी उभारण्याची योजना...
17
शौर्याची गाथा निळ्या समुद्राखाली विसावणार, INS गुलदारचे रुपांतर देशाच्या पहिल्या पाण्याखालील संग्रहालयात
18
सोन्याच्या दरात मोठी घसरण! फक्त ४ दिवसांत ७,००० रुपयांहून अधिक स्वस्त; काय आहे कारण?
19
RO-KO च्या चाहत्यांसाठी खुशखबर! पुढील वनडे कधी खेळणार? जाणून घ्या तारीख...
20
समर्थक जिंदाबादच्या घोषणा देत असताना स्टेज कोसळला; बाहुबली नेते अनंत सिंह पडले खाली

शासनाने स्वखर्चाने ‘त्या’ मुलाचा मृतदेह आईकडे पोहोचवावा; हायकोर्टाचे आदेश, काय आहे घटना?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 17:39 IST

अंत्ययात्रा न काढता प्रथेप्रमाणे अंत्यसंस्काराचे आदेश

छत्रपती संभाजीनगर : सुमारे ८ महिन्यांपूर्वी खून झालेल्या मुलाचा पुरलेला मृतदेह उकरून, शासनाने स्वखर्चाने त्याच्या आईच्या घरी पोहोचवावा. अंत्ययात्रा न काढता प्रथेप्रमाणे अंत्यसंस्कार करावेत, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या न्या. विभा कंकणवाडी व न्या. रोहित डब्ल्यू जोशी यांनी दिला आहे.

काय होती घटना?गंगापूर (जि. छत्रपती संभाजीनगर) येथील झंपराबाई श्रीमंत भोसले यांनी त्यांचा ३५ वर्षांचा मुलगा रवी हरवल्याची तक्रार मे २०२४ मध्ये गंगापूर पोलिस ठाण्यात दिली होती. नेवासा तालुक्यातील मुळा धरणात एक छिन्नविच्छिन्न झालेल्या मृतदेहाचे सहा तुकडे सापडले होते. गंगापूर पोलिसांनी डीएनए चाचणीसाठी झंपराबाईंच्या रक्ताचे नमुने घेतले. ऑक्टोबर २०२४ मध्ये डीएनए अहवाल आला. त्यात महिलेचा डीएनए धरणात सापडलेल्या प्रेताच्या तुकड्यांशी जुळला. पोलिसांनी मे २०२४ मध्ये नमुने घेतल्यानंतर मृतदेह पुरून टाकला होता. मयत मुलाच्या शवाचे अवशेष मिळावेत, यासाठी मयताच्या आईने नेवाशाच्या तहसीलदारांकडे अर्ज केला. तहसीलदारांनी कायद्याप्रमाणे पोलिसांनी निर्णय घ्यावा, असे आदेश दिले.

आईची न्यायालयात धावत्यानंतरही पोलिस शवाचे तुकडे देत नसल्याने आईने नेवासा न्यायालयात दाद मागितली. तेथे पोलिसांनी अहवाल सादर केला. पण पोलिसांनी न्यायालयात अनेक अटी टाकल्या होत्या. नेवासा न्यायालयाने कायद्यात तरतूद नसल्याचे कारण सांगत शवाचे तुकडे देण्यास नकार दिला. आदेश देणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर अर्ज मागे घेण्यात आला. त्यानंतर रवीच्या आईने ॲड. योगेश बोलकर व ॲड. काकासाहेब जाधव यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली असता खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिला.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठPoliceपोलिस